इमारत पाडण्याच्या परवानगीने दहा दुकानदारांचा संसार उघड्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 06:00 AM2020-01-29T06:00:00+5:302020-01-29T06:00:48+5:30

येथील मुख्य बाजारात गणेश व्यापारी संकुल आहे. या संकुलात दहा व्यापारी गत चाळीव वर्षांपासून आपला व्यवसाय करीत आहे. परंतु सहा महिन्यापूर्वी इमारतीच्या मालकाने दुकानदारांना कोणतीच पुर्व सूचना न देता इमारत जिर्ण झाल्याचे कारण पुढे केले. नगर परिषदेकडे इमारत पाडण्याची परवानगी मागितली. त्यावर नगर परिषदेने तात्काळ मंजूरी दिली. आता इमारत पाडण्याच्या हालचाली येथे सुरु झाल्या आहेत.

Ten shopkeepers open the world with permission to demolish the building | इमारत पाडण्याच्या परवानगीने दहा दुकानदारांचा संसार उघड्यावर

इमारत पाडण्याच्या परवानगीने दहा दुकानदारांचा संसार उघड्यावर

Next
ठळक मुद्देतुमसर नगर परिषद : दुकानदारांनी दिला आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क
तुमसर : येथील बोसनगरातील गणेशभवन व्यापारी संकुलाची इमारत पाडण्याची परवानगी नगर परिषदेने दिल्याने दहा दुकानदारांचा संसार उघड्यावर येणार आहे. आता उदरनिर्वाह कसा करावा असा प्रश्न पडलेल्या या दुकानदारांनी मंगळवारी तहसीलदार आणि मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देवून आंदोलनाचा इशारा दिला आहे.
येथील मुख्य बाजारात गणेश व्यापारी संकुल आहे. या संकुलात दहा व्यापारी गत चाळीव वर्षांपासून आपला व्यवसाय करीत आहे. परंतु सहा महिन्यापूर्वी इमारतीच्या मालकाने दुकानदारांना कोणतीच पुर्व सूचना न देता इमारत जिर्ण झाल्याचे कारण पुढे केले. नगर परिषदेकडे इमारत पाडण्याची परवानगी मागितली. त्यावर नगर परिषदेने तात्काळ मंजूरी दिली. आता इमारत पाडण्याच्या हालचाली येथे सुरु झाल्या आहेत. विशेष म्हणजे या लघु व्यवसायीकांना संकुल मालकाने अद्यापही लेखी सूचना दिली नाही. परंतु इमारत पाडण्याचा घाट घातल्याने एकच खळबळ उडाली. शेवटी या व्यवसायीकांनी गणेश भवन बचाव संघर्ष समिती स्थापन केली. तहसीलदार व मुख्याधिकाऱ्यांना निवेदन देऊन इमारत न पाडण्याची मागणी केली. अन्यथा आंदोलनाचा इशाराही दिला आहे.
पूर्व सुचना न देता दुमजली इमारत भूईसपाट झाल्यावर आम्ही कुठे जावे असा प्रश्न या व्यवसायीकांनी केला आहे. पर्याय व्यवस्था न होताच इमारतीतून साहित्य कुठे न्यावे असा प्रश्न त्यांच्या पुढे निर्माण झाला आहे. तात्काळ परवानगी देण्यामागचे कारण काय? असा प्रश्न आहे.

इमारतीची विक्री केल्याची शहरात चर्चा
गणेश भवन इमारतीची विक्री केल्याची शहरभर चर्चा आहे. तुमसर शहरात जुन्या इमारती विकण्याचा गोरखधंदा सुरु आहे. या इमारतीची जागा भाडेतत्वावर असल्याची माहिती दुकानदारांनी दिली. चाळीस वर्षापासून व्यवसाय करणाºयांना येथून कसे बाहेर काढता येते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. इमारत जुनी असल्याचे कारण दिले तरी ते कारण मात्र कुणाला पटण्यासारखे नाही.

३० वर्षापेक्षा जास्त वर्ष झालेल्या घरमालकांना घर पाडण्याची नोटीस दिली आहे. एकदा दिलेली परवानगी मला थांबविण्याचा अधिकार नाही.
- अर्चना मेंढे, मुख्याधिकारी

शहरात अनेक जुन्या इमारती आहे. नगर परिषदेचे मुख्य प्रवेशद्वार १०० वर्षापेक्षा जास्त वर्षाचे आहे. ते तुम्ही पाडणार काय? इमारत नियमबाह्यपणे येथे विक्रीची हालचाल आहे. चौकशी न केल्यास आंदोलन करण्यात येईल.
- डॉ. चंद्रशेखर भोयर, अध्यक्ष
गणेश भवन बचाव संघर्ष समिती

Web Title: Ten shopkeepers open the world with permission to demolish the building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.