शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस प्रदेशाध्यक्षांसाठी उघडले मंदिर, मग सर्वसामान्यांसाठी बंद का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2021 08:35 IST

भंडाऱ्यातील घटना; माजी आमदाराला मात्र परत पाठविले

ठळक मुद्देमंदिरे खुली करण्याची आमची मागणीच आहे. आघाडी सरकार त्यांच्या नेत्यांसाठी कायदे गैरलागू करतात. मंदिरेही उघडतात. यापूर्वी भास्कर जाधवांच्या मुलाचा अभिषेक झाला.

गणेश देशमुख मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भंडारा जिल्ह्यातील चारभट्टी देवस्थानात शनिवारी महापूजेसाठी प्रवेश दिला असताना जिल्ह्यातील चांदपूर देवस्थानात महाआरतीसाठी आलेले भाजपचे माजी आमदार चरण वाघमारे यांना मात्र मंदिर प्रवेशबंदीचा नियम सांगून पायऱ्यांवरच रोखण्यात आले. पटोलेंसोबत भाविक-कार्यकर्तेही होते. पटोले यांना गाभाऱ्यात महापूजेसाठी प्रवेश देण्यात आला. वाघमारे मंदिरे उघडण्याच्या  मागणीसाठी आले होते. त्यांना बजरंगबलीची आरती करायची होती. भाविकांना पोलिसांनी पायऱ्यांवरच रोखून धरले. याबाबत जिल्हाधिकारी संदीप कदम यांना वारंवार संपर्क करूनही ते उपलब्ध झाले नाहीत.  

मंदिरे खुली करण्याची आमची मागणीच आहे. आघाडी सरकार त्यांच्या नेत्यांसाठी कायदे गैरलागू करतात. मंदिरेही उघडतात. यापूर्वी भास्कर जाधवांच्या मुलाचा अभिषेक झाला. आता नाना पटोलेंनी महापूजा केली. मग सर्वसामान्यांसाठीच मंदिरे बंद का?- चरण वाघमारे, माजी आमदार, भाजप

चरण वाघमारे यांच्या महाआरतीबाबत मोबाइलवर मेसेज वितरित झाल्याने आम्हाला माहिती झाले. त्यांचा चांदपूर मंदिर प्रवेश आम्ही रोखला. नाना पटोले यांच्या चारभट्टीच्या महापूजेबाबत आम्ही अनभिज्ञ आहोत. मंदिर प्रवेशबंदीचा आदेश जिल्हा प्रशासनाचा आहे. त्यांना विचारता येईल. - वसंत जाधव, जिल्हा पोलीस अधीक्षक, भंडारा 

टॅग्स :congressकाँग्रेसTempleमंदिरbhandara-acभंडारा