आता सांगा ! अंत्यसंस्कार करणार कुठे?

By Admin | Updated: July 4, 2016 00:26 IST2016-07-04T00:26:17+5:302016-07-04T00:26:17+5:30

मानवी जीवनाच्या अंतीम वेळेतरी पार्थिवावर निवांत सावली राहायला पाहिजे,

Tell me now! Where will the funeral call? | आता सांगा ! अंत्यसंस्कार करणार कुठे?

आता सांगा ! अंत्यसंस्कार करणार कुठे?

शेड कोसळले : उसर्रावासी नवीन स्मशान शेडच्या प्रतिक्षेत
उसर्रा : मानवी जीवनाच्या अंतीम वेळेतरी पार्थिवावर निवांत सावली राहायला पाहिजे, पण उसर्रा येथील स्मशान घाटातील शेड कोसळल्याने अंत्यसंस्कार विधी करायचा कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळा सुरु असतांना या समस्येत अधिक वाढ होणार आहे.
येथील स्मशान घाट शेड अनेक दिवसांपासून लोंबकळत होता. मे महिन्यात अवकाळी पाऊस व वादळामुळे शेडला अवकळा आली. यादरम्यान ते शेड कोसळले. येथील स्मशानघाट शेडच्या संदर्भात येथील ग्रामपंचायतीने संबंधित विभाग व शासनाकडे वारंवार नवीन स्मशानघाटविषयी निवेदन दिले. नविन स्मशानघाट शेड तर मिळाला नाही. पण अनेक दिवसापासून लोंबकळत असलेला जुना स्मशानघाट शेड अवकाळी पाऊस वादळामुळे पूर्णत: कोसळला. आता पावसाळा सुरु झाला असून येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्याने नविन शेडसाठी पायपीट सुरु केली आहे.
दोन वर्षापासून नाकर्त्या प्रशासनाने याकडे लक्ष दिले नाही. नवीन स्मशानघाट शेड न झाल्यास अंत्यसंस्कारासाठी प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. शासन कित्येक योजनेवर पैसा खर्च करते पण त्याचा कधीही पाठपुरावा करत नाही पण निदान या कामासाठी शासनाने निधी उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी घ्यायला पाहिजे.

Web Title: Tell me now! Where will the funeral call?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.