दूरसंचार अधिकाऱ्याने केला ‘सीम कार्ड’चा गैरवापर
By Admin | Updated: August 3, 2014 23:09 IST2014-08-03T23:09:29+5:302014-08-03T23:09:29+5:30
बीएसएनएलच्या सीमवरुन जातीय तेढ निर्माण करणारे अश्लिल एसएमएस पाठविण्यात आले. या प्रकरणी बीएसएनएलचे वरिष्ठ अधिकारी शफी इस्माईल शेख यांच्यासह तिघांवर साईबर क्राईम अंतर्गत

दूरसंचार अधिकाऱ्याने केला ‘सीम कार्ड’चा गैरवापर
भंडारा : बीएसएनएलच्या सीमवरुन जातीय तेढ निर्माण करणारे अश्लिल एसएमएस पाठविण्यात आले. या प्रकरणी बीएसएनएलचे वरिष्ठ अधिकारी शफी इस्माईल शेख यांच्यासह तिघांवर साईबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी नगरसेवक विकास मदनकर यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिलेल्या तक्रारीतून केली आहे.
नगरसेवक मदनकर यांच्याकडे बीएसएनएलचे सीमकार्ड आहे. २४ जुलैला त्यांचे सीमकार्ड दुपारच्या सुमारास अचानकपणे बंद पडले. याबाबतची त्यांनी २५ जुलैला बीएसएनएल कार्यालयाकडे सकाळी तक्रार नोंदविली.
दरम्यान त्यांचा तो सीम बीएसएनएलचे एस.डी.ओ.टी. शफी इस्माईल शेख यांनी जाणीवपूर्वक बंद करुन त्याच नंबरचा दुसरा सीमकार्ड सुरू केला. व त्या नंबरवरुन विकास मदनकर यांना पूर्वकल्पना न देता शेख यांनी स्वत:च्या सीमकार्डवर अश्लिल तथा जातीवाचक शिविगाळ असलेले एसएमएस पाठविला. या एसएमएसमुळे समाजात तेढ निर्माण करुन मदनकर यांच्या विरोधात षडयंत्र रचण्याचा या मागचा शेख यांचा मनसुबा होता, असा आरोप मदनकर यांनी केला आहे. यानंतर मदनकर यांनी शेख यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीत शेख यांनी त्यांच्या अधिकाराचा गैरवापर करुन लिपीक एम.जे. खान व नियमीत मजूर लीलाधर डेकाटे यांना हाताशी धरुन कटकारस्थान केल्याचा आरोप केला आहे.
याबाबत भंडारा पोलीस स्टेशन, दूरसंचार मंत्रालय, पोलीस अधीक्षक, सायबर क्राईम सेल आदींना निवेदने पाठवून शेख यांच्यासह तिघांवर सायबर क्राईम अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. (शहर प्रतिनिधी)