टेकेपार, डोडमाझरीत दारूबंदीमुळे महिलांत आनंद
By Admin | Updated: June 9, 2016 00:44 IST2016-06-09T00:44:13+5:302016-06-09T00:44:13+5:30
'गाव करी ते राव नाही' या म्हणी प्रमाणे दारूबंद करण्याचे काम ज्या विभागावर देण्यात आली आहे.

टेकेपार, डोडमाझरीत दारूबंदीमुळे महिलांत आनंद
गावात नांदते शांतता : सिमावर्ती भागात ग्रामस्थांची करडी नजर
दिनेश रामटेके आमगाव (दिघोरी)
'गाव करी ते राव नाही' या म्हणी प्रमाणे दारूबंद करण्याचे काम ज्या विभागावर देण्यात आली आहे. त्या विभागाने नांगी टाकली असल्याने गावकऱ्यांनीच गावातील संपूर्ण मोहफुलाची दारूबंद करण्याचा निर्णय टेकेपार, डोडमाझरी येथील गावकऱ्यांनी पाच वर्षापुर्वी केला व आजतागत गावातील दारूपूर्णपणे बंद आहे. यामुळे गावात शांतता नांदत असून पोलीस विभागाला जे जमले नाही ते गावकऱ्यांनी करून दाखविले.
या गावामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध मोहफुलाची दारू विक्री केल्या जात होती. गावामध्ये गल्लोगल्ली दारूचा महापूर आला होता. तरूणवर्ग मोठ्या प्रमाणात दारूच्या आहारी गेला होता. अनेकांनी दारूमुळे आपले कामधंदे बंद केले होते. याचा सर्वात जास्त फटका महिला वर्गाला बसला. परिसरामध्ये गाव बदनाम झाला. त्यामुळे गावातील पोलीस पाटील सरपंच व तंटामुक्त समितीचे अध्यक्षांनी गावातील दारू पुर्णपणे बंद करण्याचा निर्धार केला. या मोहिमेला गावातील तरूण पोरांची साथ मिळाली व पाहता पाहता गाव संपूर्ण दारूबंदी मुक्त झाला.
कधी कधी दारू विक्री करणाऱ्यांनी डोके वर काढले. गावाबाहेर दारूविक्रीचे अड्डे सुरू केले. दारूविक्रेत्यांनी दारूविक्रीसाठी गावातील स्मशानभूमिची जागा सुद्धा सोडली नाही. स्मशानात पेटत्या शरणासमोर सुद्धा दारू विकल्या गेली. त्यामुळे गावाच्या शिवेच्या आत दारूविक्रीसाठी मनाई करण्यात आली.