विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविते ‘तेजस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 22:52 IST2018-10-13T22:51:59+5:302018-10-13T22:52:22+5:30
विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे आणि शिक्षकांना शैक्षणिक विकासाची संधी उपलब्ध करून देणारा तेजस प्रकल्प साकोली तालुक्यात प्रभाविपणे राबविला जात आहे. महाराष्ट्र शासन, टाटा ट्रस्ट आणि ब्रिटीश कॉन्सीलच्या माध्यमातून राबविल्या जाणाº या या प्रकल्पातून साकोली तालुक्यातील विद्यार्थी तेजोमय होणार आहेत.

विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविते ‘तेजस’
संजय साठवणे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
साकोली : विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविणे आणि शिक्षकांना शैक्षणिक विकासाची संधी उपलब्ध करून देणारा तेजस प्रकल्प साकोली तालुक्यात प्रभाविपणे राबविला जात आहे. महाराष्ट्र शासन, टाटा ट्रस्ट आणि ब्रिटीश कॉन्सीलच्या माध्यमातून राबविल्या जाणाº या या प्रकल्पातून साकोली तालुक्यातील विद्यार्थी तेजोमय होणार आहेत.
गतवर्षी राज्यातील नऊ जिल्ह्यात तेजस प्रकल्प प्रायोगीक तत्वावर राबविण्यात आला. या प्रकल्पाचे यश लक्षात घेऊन २७ जिल्ह्यामध्ये हा प्रकल्प राबविल्या जात आहे. शिक्षकांना विद्या प्राधीकरण औरंगाबादच्या माध्यमातून टॅग समन्वयक पदासाठी लिंक भरून घेण्यात आली. उत्कृष्ट काम करणाऱ्या शिक्षकांना आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाºया शैक्षणिक परिषदांमध्ये सहभागी होण्याची संधी सुद्धा मिळणार आहे. असा हा महत्वपूर्ण तेजस प्रकल्प साकोली तालुक्यात राबविला जात आहे. भंडारा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हा प्रकल्प सुरु आहे. जिल्ह्यातील ११ टॅग समन्वयक प्रशिक्षित होऊन आले असून जिल्ह्यातील ३३ केंद्रातील शिक्षकांना विविध तंत्रज्ञान देत इंग्रजी विषयाची व्याप्ती वाढविण्याचे काम सुरु झाले आहे. डायरेक्ट भंडारा येथे कार्यरत जनबंधू, परिहार यांच्या नियोजनातून त्याची प्रभावी अंमलबजावणी सुरु आहे.
आतापर्यंत साकोली तालुक्यात राम चाचेरे (झाडगाव), प्रकाश पाटील (सेंदूरवाफा) हे टॅग समन्वयक म्हणून काम पाहत आहेत. साकोलीचे गटशिक्षणाधिकारी एम.व्ही. कोरे, बांते, भलावी, विषयतज्ज्ञ राहुल बडोले योग्य नियोजन करीत आहेत. तेजस प्रकल्पात सहभागी होणाºया शिक्षकांना सातत्यपूर्ण व्यवसायीक विकासासह इंग्रजीचे आॅनलाईन मार्गदर्शन मिळणार आहे. प्रभावी अंमलबजावणी होत असल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता निश्चितच वाढणार आहे.
शाळा समृद्धीकरण
तेजस प्रकल्पाच्या माध्यमातून शिक्षकांद्वारे शाळा समृद्धीकरणाचे काम सुरु झाले आहे. जिल्ह्यात विविध ठिकाणी टॅग समन्वयकांच्या माध्यमातून काम प्रभावीपणे केले जात आहे. साकोली तालुक्यात हा प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत.