तंत्रज्ञानामुळे आले जग जवळ
By Admin | Updated: May 11, 2014 00:07 IST2014-05-11T00:07:44+5:302014-05-11T00:07:44+5:30
११ मे १९९८ रोजी पोखरणमध्ये अणुचाचणी केल्यानंतर भारत हा अणुअण्वस्त्र असलेल्या देशांच्या पंक्तीत येऊन बसला.

तंत्रज्ञानामुळे आले जग जवळ
भंडारा : ११ मे १९९८ रोजी पोखरणमध्ये अणुचाचणी केल्यानंतर भारत हा अणुअण्वस्त्र असलेल्या देशांच्या पंक्तीत येऊन बसला. विज्ञान-तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मिळविलेल्या आत्मनिर्भरतेमुळे हा दिवस राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो. सध्या तंत्रज्ञान या शब्दाची व्याप्ती फक्त मोबाईल, लॅपटॉप, टीव्ही यापुरतीच मर्यादित असल्याचे सर्वसामान्यांना वाटते. परंतु, सर्वसामान्यांना अशक्य वाटणार्या अडचणी सहज सोडविण्यासाठी ज्ञानाचा सुयोग्य वापर म्हणजे तंत्रज्ञान. हे तंत्रज्ञान संशोधकच घडवू शकतात. असा अनेकांचा गैरसमज असतो. खरंतर संशोधक हे काही सुपरपॉवर असलेल्या व्यक्ती नसतात. तर तुमच्या आमच्यासारखी सामान्य माणसेच असतात. पोखरण चाचणीच नव्हे पण गेल्या १०-१५ वर्षात आपल्या जीवनात काय बदल झाले, असा विचार करण्यासाठी हा चांगला दिवस मानायला हवा. पेजरनंतर इनकमिंगलाही पैसे मोजावे लागणारा मोबाईल आपण पाहिला. आज इनकमिंग फ्र ी झालेला मोबाईल फोन श्रमिकांपासून रिक्षाचालकांसह सर्वांच्या हाती आला. तंत्रज्ञानाची ही मोठी क्र ांती मानण्यात येते. २०१४ च्या मध्यापर्यंत देशभरात कोट्यवधी मोबाईल ग्राहकांची भर पडली. आजमितीस देशभरात मोबाईल बाळगणार्या ग्राहकांची संख्या ४९ कोटींच्या घरात आहे. निव्वळ संख्येने नव्हे तर मोबाईलच्या कार्यातही कित्येकपटींनी गुणात्मक फरक पडला. मोबाईलमध्ये आलेल्या नवनविन तंत्रज्ञानामुळे तो तुमचा पर्सनल सेक्रे टररी बनला. पूर्वी लोक डिजीटल डायर्या घ्यायचे. आता त्या मोडीत निघाल्या. वॉकमनवरून आयपॉड, एमपीथ्री, एमपीफोरपर्यंत संगीतप्रेमी पुढे सरकले. हे सगळं शहरापुरतं नव्हे तर गावापर्यंतही पोहोचलं. प्रकृतीतील लहान लहान बाबीकडे सजग दृष्टीने नजर टाकल्यास आपल्यालाही एखादा शोध लागू शकतो. परंतु, तंत्रज्ञानाची व्याप्ती प्रचंड प्रमाणात वाढली तरी त्याचा पुरेपुर फायदा आपण घेत आहोत का? हा प्रश्न कायम आहे. तंत्रज्ञान स्वस्त जरूर झालं आणि त्यामुळेच ते सर्वांपर्यंत पोहोचंल. पण यातून सरकारी स्तरावर कितपत बदल झाला? प्रशासकीय कारभारात ई-गव्हर्नन्स कितपत रुजला? सुरुवातीला तंत्रज्ञानाच्या बाबतीत हैदराबाद शहराचा चांगलाच बोलबाला होता. नुकत्याच झालेल्या लोकसभा मतदानाच्या पार्श्वभुमीवर एक गोष्ट दिसून आली. मतदान याद्यांमध्ये मतदारांची नावे गहाळ झाली. आधुनिक तंत्रज्ञानामुळे मतदान यंत्रणेत झालेल्या चुका टाळता येऊ शकल्या असत्या. परंतु, तसे झाले नाही. आतापर्यंत मतदानामध्ये ईव्हीएमम मशीन्स आल्या. मग देशभरातल्या मतदारांची सर्वसमावेशक यादी बनविण्यासाठी संगणकाचा उपयोग करणे अवघड नसते. मतदार याद्यांचे अर्ज आजही क्लिष्ट आणि रकानेवालेच असतात. आजही शासकीय कार्यालयातील कामकाज कागदोपत्रीच चालतो. रेल्वेच्या आरक्षणामध्ये कुठून कुठेही तिकीट काढता येते. कोणत्याही ई-मेलवर एकच युजरनेम आणि एकच पासवर्ड देऊन दोन अकाऊंट उघडता येत नाहीत. मग अशी व्यवस्था मतदानाच्या वेळी करता आली तर ? हे सर्व शक्य आहे. त्यासाठी आहे त्या तंत्रज्ञानाच्या भरवश्यावर चांगली कामे करण्याची मानसिकता रूढ झाली पाहिजे. (प्रतिनिधी)