शिक्षक दिनीच शिक्षकांना उपक्रमात राबविण्यात सपाटा
By Admin | Updated: September 6, 2014 01:34 IST2014-09-06T01:34:32+5:302014-09-06T01:34:32+5:30
शिक्षक दिनी शिक्षकांचा सत्कार व स्वयंशासन कार्यक्रम शाळांमधून राबविले जातात. परंतू काळ व वेळ बदलल्याने शिक्षकदिनी शिक्षकांना व्यस्त ठेवण्याचा एकमेव कार्यक्रम शासनाकडून राबविल्या जात आहे.

शिक्षक दिनीच शिक्षकांना उपक्रमात राबविण्यात सपाटा
तुमसर : शिक्षक दिनी शिक्षकांचा सत्कार व स्वयंशासन कार्यक्रम शाळांमधून राबविले जातात. परंतू काळ व वेळ बदलल्याने शिक्षकदिनी शिक्षकांना व्यस्त ठेवण्याचा एकमेव कार्यक्रम शासनाकडून राबविल्या जात आहे. पंतप्रधानांचे भाषणाची तयारी तथा वृक्षसंवर्धन संगोपनाची विशेष तपासणी मोहिम या दिवशी शिक्षकवृंदानी हाती घेतले हे विशेष.
भारताचे माजी दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून देशात साजरा केला जातो. भावी पिढी घडविणाऱ्या शिक्षकांचा हा सन्मानाचा दिवस. राज्य व केंद्र शासनही आदर्श शिक्षकांचा सत्कार करते, परंतु प्रस्ताव पाठविणे, त्याचा पाठपुरावा करणे सुमारे २२ ते २५ बिंदूची पूर्ती येथे करावी लागते. हाडाचा शिक्षक शिकविणे, उपक्रम राबविणे सोडून बिंदूची पूर्तता करणार काय? जिल्ह्यात ज्यांचे नाव अधिकारी, शिक्षक व सर्वसामान्यांच्या तोंडी आहे, ज्यांना राज्याचा क्रीडामंत्री नावाने त्यांच्या गगनभेदी कार्यामुळे ओळखतो, असे जि.प. शाळा दावेझरीचे शिक्षक अ.वा. बुद्धे यांचा अजुनपर्यंत शासनाने आदर्श शिक्षक म्हणून गौरव केला नाही.
क्रीडा प्रबोधिनी पुणे, गडचिरोली, नागपूर व अमरावती येथे मागील काही वर्षात ८० ते ९० विद्यार्थी त्यांनी धाडले आहेत. ज्युनिअर राष्ट्रीय हॉकी संघात चार खेळाडू ज्यांचे खेळत आहेत त्यांचा विसर शाळाला पडला आहे. मागील १८ ते २० वर्षापासून अविरत ते परिश्रम घेत आहेत.
जिल्ह्यातील आतापर्यंत ज्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाला आहे त्यात अपवाद वगळता अशी उल्लेखनीय कामगिरी केल्याचे दिसत नाही. ओळखणे तर दूर, सच्च्या शिक्षकांना हा पुरस्कार मिळाला तर त्या पुरस्काराचाही मान वाढेल, अशी अपेक्षा आहे. (तालुका प्रतिनिधी)