शिक्षकांनी घरी जाऊन केला गुणवंतांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:24 IST2021-07-21T04:24:15+5:302021-07-21T04:24:15+5:30
तुमसर : इयत्ता दहावीच्या निकालात जनता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून, शाळेची ...

शिक्षकांनी घरी जाऊन केला गुणवंतांचा सत्कार
तुमसर : इयत्ता दहावीच्या निकालात जनता विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. शाळेचा निकाल शंभर टक्के लागला असून, शाळेची विद्यार्थिनी श्रावणी दिनेश ढबाले हिला ९३.४० टक्के गुण मिळून ती शाळेतून प्रथम आली आहे. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंदांनी गुणवंत विद्यार्थ्यांची घरी जाऊन सत्कार केला.
या शाळेतील वैष्णवी रिना येते ९३.३०, श्रावरी ढबाले ९३.२०, कनक शेबे ९२.२०, कशिष चौधरी ९२.२०, रेश्मा शेंडे ९१.८०, अंजली सेलोकर ९१.६०, कृपाली ढबाले ९०.६० गुण प्राप्त केले. शाळेतील २९७ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ५५ विद्यार्थी प्रावीण्य श्रेणीत प्रथम श्रेणीत ११२ विद्यार्थी तर द्वितीय श्रेणीत १३० विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे विश्वस्त डॉक्टर कृपाचार्य बोरकर, विश्वस्त राम नारायण बोरकर, संस्थाध्यक्ष दिलीप भाऊ बोरकर, सचिव कुंदन भाऊ बोरकर, मुख्याध्यापक राजकुमार गभणे, उपमुख्याध्यापक राजकुमार राठी, विज्ञान शिक्षक पंकज बोरकर, प्राध्यापक, शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.