मागण्यांसाठी शिक्षक संघ थेट अधिकाऱ्यांच्या दालनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:24 IST2021-07-15T04:24:50+5:302021-07-15T04:24:50+5:30
गोंदिया : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा व तालुका गोंदियाकडून शिक्षकांचे ज्वलंत प्रश्न मिटविण्यासाठी १२ ...

मागण्यांसाठी शिक्षक संघ थेट अधिकाऱ्यांच्या दालनात
गोंदिया : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ जिल्हा व तालुका गोंदियाकडून शिक्षकांचे ज्वलंत प्रश्न मिटविण्यासाठी १२ जुलै रोजी शिक्षणाधिकारी व मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांची भेट घेऊन विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली.
गोंदिया पंचायत समितीअंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांच्या खात्यावर सहाव्या वेतन आयोगाचे तिसरा, चौथा, पाचव्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात यावी, ६ वा वेतन आयोग लागू होऊन १२ वर्षे पूर्ण होत आहेत, पण शिक्षकांचे थकबाकीचे हप्ते शिक्षकांच्या खात्यावर जमा झालेले नाहीत. ३, ४ व ५ व्या हप्त्याची रक्कम एकमुस्त खात्यात जमा करण्यात येईल. पंचायत समिती गोंदियाअंतर्गत कार्यरत शिक्षकांची शाळा व केंद्रवार प्रात जी. पी. एफ. पावत्यांची माहिती स्वीकारावी, मुख्य वित्त लेखा अधिकारी यांच्या कार्यालयातील संबंधित कर्मचाऱ्यांनी मागविलेल्या माहितीनुसार गोंदिया पं.स. अंतर्गत कार्यरत प्राथमिक शिक्षकांची संघटनेला प्राप्त झालेली वैयक्तिक माहिती कार्यालयात सादर करण्यात आली. सातव्या वेतन आयोगाचे वेतन निश्चितीस मान्यता देण्यात यावी. जुलै २०२१ ची सेवापुस्तकात नोंद करून प्रत्येक पंचायत समितीच्या शिक्षण विभागाने ५०-५० पुस्तकांचे गट तयार करून शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्यामार्फत वित्त विभागात मंजुरीकरिता पाठवावे. विविध कामांकरिता शिक्षण विभाग जि.प.ला पाठविण्यात आलेल्या सेवापुस्तिका संबंधित पं.स.ला परत पाठविण्यात याव्यात. दीड वर्षापासून विविध कामांनिमित्त पाठविण्यात आलेली सेवापुस्तके रोखून ठेवण्यात आलेली आहेत. ती पंचायत समित्यांना पाठविण्यात यावीत. प्राथमिक शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे यांच्या दालनात झालेल्या चर्चेत उपशिक्षणाधिकारी ए. डी. मालाधारी, उपशिक्षणाधिकारी अनिल चव्हाण, खुडशाम, तर मुख्य लेखा व वित्त अधिकारी यांच्या दालनात मुख्य लेखा व वित्त अधिकारी वहाणे, वरिष्ठ लेखाधिकारी बागडे, वरिष्ठ लेखाधिकारी देशमुख उपस्थित होते.
याप्रसंगी संघटनेचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष वीरेंद्र कटरे, जिल्हा संघटक केदार गोटेफोडे, तालुका अध्यक्ष वाय. डी. पटले, सरचिटणीस मोरेश्वर बडवाईक, संघटक एम. डी. फड व शिक्षक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.