शिक्षकांनी आॅनलाईनचा धसका घेऊ नये
By Admin | Updated: October 5, 2015 01:00 IST2015-10-05T01:00:23+5:302015-10-05T01:00:23+5:30
शाळेची आॅनलाईन माहिती शाळेच्या वेळेतच भरावी याकरिता कोणतीही भीती मनात बाळगू नये.

शिक्षकांनी आॅनलाईनचा धसका घेऊ नये
शिक्षक परिषद : नागो गाणार यांचे प्रतिपादन
तुमसर : शाळेची आॅनलाईन माहिती शाळेच्या वेळेतच भरावी याकरिता कोणतीही भीती मनात बाळगू नये. शासन कोणत्याही पक्षाचे असले तरी शेवटी शिक्षकांना प्रलंबित मागण्याकरिता संघर्ष करणे अपरिहार्य आहे, असे प्रतिपादन नागपूर विभागीय शिक्षक परिषदेचे आमदार नागो गाणार यांनी केले.
ते सरस्वती विद्यालय खापा येथे आयोजित शिक्षक परिषदेच्या तालुका अधिवेशनात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष अशोक वैद्य होते. तर प्रमुख अतिथी म्हणून नागपूर विभागीय अध्यक्ष डॉ. उल्हास फडके, उपाध्यक्ष के.के. वाजपेयी, कार्यवाह अंगेश बेहलपांडे, रंगारी, बोपचे, मुख्याध्यापक सेवकराम मने उपस्थित होते.
आ. गाणार पुढे म्हणाले, निवड श्रेणीच्या अनावश्यक अटी रद्द करण्यासंदर्भात शिक्षण मंत्री विनोद तावडे तयार नाही. शिक्षकांचे वैद्यकीय प्रतिपूर्ती बिल दोन लाखांपर्यंत शिक्षणाधिकाऱ्यांना निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले. वेतन महिन्याच्या पहिल्या तारखेलाच मिळणार असून शासन व टाटा कॅन्सलटन्सी यामधील आॅनलाईन करार जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत आॅनलाईन बिले स्वीकारण्याचे निर्देश वेतन पथक कार्यालयाला दिले आहे. यामुळे वेतन वेळेवरच मिळणार आहे.
याप्रसंगी अन्य उपस्थित मार्गदर्शकांनी आरटीई कायदा, इयत्ता पहिली ते पाचवी, सहावी ते आठवी, व नववी ते दहाव्या वर्गाकरिता विद्यार्थी शिक्षक यांचे प्रमाण २८ आॅगस्ट २०१५ च्या शासन निर्णयाबद्दल सविस्तर माहिती दिली. प्रास्ताविक कार्यवाह रा.म. कडव, संचालन व आभार एस.सी. कुथे यांनी केले. अधिवेशनाला संयोजक पी.एम. नाकाडे, पी.बी. टेंभरे, प्रमोद संग्रामे, एस.आर. हिंगे, आर.जी. लिमजे, एस. के. गाढवे, यु.जी. कटरे, बोंदरे, वाय.आर. कापगते, व्ही.बी. लंजे, एस.बी. पटले, डी.एस. गायकवाड, आर.आर. ठाकरे, मुरली गोरवे, पी.पी. भाजीपाले, एस. एस. गौपाले, व्ही.डी. चोपकर, एम.जी. परबते यांनी सहकार्य केले. याप्रसंगी तालुक्यातील शिक्षक, शिक्षिका मोठ्या संख्येने उपस्थित होते. काही शिक्षकांनी आमदारांना येणाऱ्या अडचणींची माहिती दिली. (तालुका प्रतिनिधी )