आॅनलाईन लोकमततुमसर : भंडारा जिल्हा परिषद माध्यमिक, उच्च माध्यमिक व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेची सहविचार सभा पार पडली. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आ.चरण वाघमारे तथा शिक्षणाधिकाऱ्यांना शिष्टमंडळाने भेट घेऊन निवेदन दिले.सभेच्या अध्यक्षस्थानी शिक्षक नेते श्याम ठवरे होते. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष ओ.बी. गायधने, रवी मेश्राम, प्रकाश करणकोटे, डब्लू.आर. गजबे उपस्थित होते.सभेत आंतरजिल्हा बदलीकरिता राज्यस्तरावर आॅनलाईन पोर्टल सुरु आहे. जिल्हा अंतर्गत बदल्या २०१५ जीआर नुसार करणे, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक क म शिक्षक पदोन्नती करणे, वरिष्ठ व निवड श्रेणीची प्रकरणे निकाली काढणे, मुळ माध्यमिक शिक्षक व पदोन्नत माध्यमिक शिक्षक यांच्या ग्रेड पे मधील तफावत दूर करणे, प्रवास भत्ता आॅफलाईन तरतूद करणे, खासगी शिक्षकांचे जि.प. मध्ये समायोजन न करणे, संच मान्यता दुरुस्त करणून समायोजन करणे, १ जानेवारी २०१८ ची सेवाज्येष्ठता यादी त्वरीत प्रकाशित करणे, अंशकालीन निर्देशक व घड्याळी तासिका शिक्षकांचे थकीत मानधन त्वरीत अदा करणे, ६ ते ८ मधील विषय शिक्षकांना वेतन श्रेणी लागूक रणे, जुनी पेंशन योजना लागू करणे, डीसीपीएसची रक्कम जीपीएफ ला जमा करून पावती देणे, शिष्यवृत्ती आॅफ लाईन मंजूर करून त्वरीत देयके देणे तथा अन्य मागण्यांचा निवेदन मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी चोले यांना देण्यात आले. आ. वाघमारे यांना संघटनेचे शिष्टमंडळ भेटून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचे निवेदन देण्यात आले. आ.वाघमारे यांना चर्चेदरम्यान शिक्षकांच्या समस्या सांगण्यात आल्या. दि. ३० जानेवारीला शिष्टमंडळ मुंबई मंत्रालयात घेऊन जाण्याचे आश्वासन आ.वाघमारे यांनी दिले.याप्रसंगी कार्यवाह संदीप वहिले, एच.एन. शहारे, विजय हटवार, गोपाल राठोड, शरद वाघमारे, जी.एल. क्षीरसागर, गोपाल लांजेवार, बाळू चव्हाण, सी.जी. गिरीपुंजे, डी.डी. नवखरे, पी.एस. गौपाले, शेंडे, एच.पी. लांजेवार, पवार, गडदे, काळे, आडे, जे.बी. गायधने, भोयर, गायधने, पांजस्थाने, मुकुंद ठवकर, सोनुले, डी.आर. हटवार, नामदेव साठवणे, कलीम शेख, मदन मेश्राम आदी शिक्षकवृंद उपस्थित होते.
शिक्षकांच्या समस्या मंत्रालयात मांडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 22:15 IST
भंडारा जिल्हा परिषद माध्यमिक, उच्च माध्यमिक व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेची सहविचार सभा पार पडली.
शिक्षकांच्या समस्या मंत्रालयात मांडणार
ठळक मुद्देशिष्टमंडळ भेटणार : शिक्षक संघटनेचे शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन