शिक्षकांच्या खिशाला भुर्दंड
By Admin | Updated: August 11, 2015 00:48 IST2015-08-11T00:48:36+5:302015-08-11T00:48:36+5:30
राज्य शिक्षण विभागाने प्राथमिक शाळेपासून ते उच्च माध्यमिक विद्यालय तथा शिक्षक व विद्यार्थ्यांची महत्वाची माहती संगणीकृत करण्याचा निर्णय घेतला आहे.

शिक्षकांच्या खिशाला भुर्दंड
मुख्याध्यापकांची उडाली धांदल : सरल प्रणालीचा फटका
पुरुषोत्तम डोमळेसानगडी
राज्य शिक्षण विभागाने प्राथमिक शाळेपासून ते उच्च माध्यमिक विद्यालय तथा शिक्षक व विद्यार्थ्यांची महत्वाची माहती संगणीकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हयातील २२९ माध्यमिक शाळातील ४५ हजार ४४४ विद्यार्थ्यांसह १ हजार ४४३ शिक्षकांचा सरल प्रणालीत सहभागी आहे. परंतु सदर शाळेमध्ये यंत्रसामुग्री उपलब्ध नसल्याने शिक्षकांच्या खिशावर आर्थिक भुर्दंड पडत आहे. तसेच अल्प कालावधीत शाळांना माहिती संकलित करावयाची असल्याने शाळांमधील शिक्षक व मुख्याध्यापकांची धांदल आली आहे.
तंत्रज्ञानाच्या काळात हा निर्णय योग्य व प्रशसनीय आहे. पंरतु माहिती १५ आॅगस्ट पर्यंत न भरल्या शिक्षकांच्या वेतनावर गडांतर येणार हा निर्णय चुकीचा आहे. राज्य शासनाच्या शालेय शिक्षका विभागाने प्राथमिक ते उच्च माध्यमिक शिक्षकांची तथा प्रत्येक विद्यार्थ्यांनी अपडेट माहिती सरल आवश्यक शिक्षक, विद्यार्थी माहितीच्या पुराव्यासोबत माहिती सादर करण्याचे आदेश दिले आहेत. विद्यार्थ्यांकरिता आधार कार्ड, नाव, आईचे नाव, वर्ग दाखल खारिज क्रमांक तर शिक्षकांना नावास हित, शिक्षण, आधार क्रमांक, वैवाहिक माहिती शिक्षकाचंी सविस्तर माहिती, सदयाचे पद वेतन, भविष्य निर्वाह निधी, धर्म, जात, नियुक्ती, आदेश, प्रशिक्षण, कुटूंबाची सरल प्रणालीकरिता स्कुलडेटा फार्म, टिचर डेटा प्रति दोन फार्म व विद्यार्थी डेटा प्रति शिक्षक दोन फार्म या प्रमाणे शेकडो फार्मचा समावेश सरल संगणकीय प्रणालीद्वारे सेव्ह करायचा असून याकरिता इंटरनेट स्कॅनरचा वापर करावा लागत आहे. शाळांमध्ये सदर यंत्र सामग्री उपलब्ध नसल्याने शिक्षकांच्या खिशावर आर्थिक भुर्दंड पडत आहे. एका वर्गाची माहिती संगणीकृत करण्यासाठी दोन-दोन दिवस लागत आहे. कधी इंटरनेट सुरु तर कधी इंटरनेट बंद असे चित्र पहावयास मिळत आहे. काही शाळांनी वर्गणी करुन स्कॅनर खरेदी केला आहे. तर काही शाळेचे शिक्षक कॅम्प्युटर इन्स्टीट्यूट मध्ये जावून तासन्तास बसत असल्याचे दिसून येत आहे. शिकविण्याला सहया विरामाचे चित्र दिसत आहे. अनेक शिक्षकांची कागदपत्र गोळा करण्यासाठी धावपळ सुरु आहे. सरल प्रणालीमुळे बोगस विद्यार्थी व बोगस शिक्षक नियुक्तीवर आळा बसेल असे शासन नाकाला जिभ लावून सांगत असेल तरी शासनाची नव्याची नवलाई व कागदी घोडे नाचविण्याचा प्रकार आहे.
जिल्हयातील शिक्षक डाटा अपडेट करण्यासाठी व्यस्त आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सरल प्रणालीची माहिती संगणीकृत करण्यासाठी मुदत वाढवून दयावी. १५ आॅगस्टपर्यंत सरल प्रणाली संगणीकृत न झाल्यास वेतनावर गडांतर येणार हा शासनाचा निर्णय चुकीचा आहे. शिक्षक संघटना याबाबद शासन स्तरावर चर्चा घडवून आणतील.
- अंगेश बेहलपांडे
जिल्हा सचिव, म.रा.शिक्षक परिषद