शिक्षक विद्यार्थ्यांनो, बहुतेक बदलात समरस व्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:39 IST2021-02-05T08:39:01+5:302021-02-05T08:39:01+5:30
अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष सुभाष वाडीभस्मे हे होते. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ. महेश हेडाऊ, डॉ. देशकर उपस्थित होते. यावेळी संस्था उपाध्यक्ष ...

शिक्षक विद्यार्थ्यांनो, बहुतेक बदलात समरस व्हा
अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष सुभाष वाडीभस्मे हे होते. तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून डॉ. महेश हेडाऊ, डॉ. देशकर उपस्थित होते. यावेळी संस्था उपाध्यक्ष वसंतराव कारेमोरे, सचिव- शिवदास उरकुडे ,सहसचिव चंद्रशेखर गिरडे , प्रभारी प्राचार्य दिलीप पाटील उपस्थित होते. डॉ. महेश हेडाऊ म्हणाले, अभ्यास करताना घ्यावयाची काळजी आणि दैनिक परिपाठ ठरविले पाहिजे. मागील विषयाची उजळणी करावी. जेणेकरून ते दीर्घकाळ स्मरणात राहील. डॉ. देशकर म्हणाले, शैक्षणिक क्षेत्रात आपले लक्ष केंद्रित असावे. जीवनात कठीण परिश्रम ही यशाची गुरुकिल्ली असते. अध्यक्षीय भाषणात सुभाष वाडीभस्मे यांनी विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने यश मिळविण्याच्या प्रयत्न करावा. आपल्या अवतीभोवती असलेल्या जीव सजीव सृष्टीच्या वैज्ञानिक संशोधन दृष्टिकोनातून अभ्यास करून शिक्षकांशी हितगुज करून नवनवीन आविष्कार घडविण्याच्या प्रयत्न करावे असे सांगितले. याप्रसंगी उपस्थित तज्ज्ञ मार्गदर्शकांनी महाविद्यालय प्राध्यापकांना नॅक कमिटीविषयी सखोल मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य दिलीप पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक ज्योती रामटेके यांनी केले तर डॉ. वंदना मोटघरे यांनी आभार मानले. यशस्वितेसाठी प्रा. चंद्रमुणी रंगारी, प्रा.हर्षानंद वासेकर ,प्रा. ज्योती रामटेके, प्रा. ममता वाडीभस्मे, प्रा. दर्शन गिरडे, प्रा. मनीषा जांभुळकर , प्रा. रूपाली रामटेके, प्रा. सुप्रिया हटवार , प्रा. दंडारे, प्रा. मिथुन मोथरकर, प्रा. चेतन हटवार, प्रा. प्रतीक घुले, प्रा. सुखदेवे, प्रा. सोहन वासनिक, प्रा. विनोद हजारे, प्रा. ईश्वर पालीवार, प्रा. राहुल वैद्य शिक्षकेत्तर कर्मचारी महादेव खंडाळे, राजेश चोपकर, दीपक आकरे, संध्या उरकुडे यांनी सहकार्य केले.