लाहोटी विद्यालयात शिक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:42 IST2021-09-08T04:42:19+5:302021-09-08T04:42:19+5:30
भंडारा : येथील बन्सीलाल लाहोटी नूतन महाराष्ट्र विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात ...

लाहोटी विद्यालयात शिक्षक
भंडारा : येथील बन्सीलाल लाहोटी नूतन महाराष्ट्र विद्यालयात डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिन शिक्षक दिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी संस्था सचिव रवींद्र भालेराव, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. उल्हास फडके मुख्याध्यापक आर. एस. बारई, पर्यवेक्षक डी. पी. राठी,शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी शिक्षक दिनानिमित्त शाळेतील सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षिका कल्पना कटरे, चैतन्य उमाळकर यांनी राधाकृष्णन यांच्या जीवन कार्याविषयी माहिती दिली. प्रमुख पाहुणे डॉ. उल्हास फडके यांनी शिक्षक दिनाविषयी मार्गदर्शन केले. संचालन अनुराधा फडणवीस यांनी केले तर आभार मुख्याध्यापक आर.एस. बारई यांनी मानले. कार्यक्रमासाठी संगीता राठी, कुकडकर, अल्लडवार, प्रशांत घाटबंधे यांनी सहकार्य केले.