शाळा टिकविण्याची जबाबदारी शिक्षकाची
By Admin | Updated: February 12, 2015 00:38 IST2015-02-12T00:38:35+5:302015-02-12T00:38:35+5:30
सरकारी शाळेत भौतिक सुविधांसह दर्जेदार शैक्षणिक साहित्य शासनाने उपलब्ध करून दिले. पण सरकारी शाळेकडे पालकांनी पाठ फिरविली आहे.

शाळा टिकविण्याची जबाबदारी शिक्षकाची
वरठी : सरकारी शाळेत भौतिक सुविधांसह दर्जेदार शैक्षणिक साहित्य शासनाने उपलब्ध करून दिले. पण सरकारी शाळेकडे पालकांनी पाठ फिरविली आहे. याकरिता शिक्षकांनी आत्मचिंतन करून दर्जेदार शिक्षणासाठी पुढाकार घ्यावा. सरकारी शाळा टिकविणे ही शासनाची जबाबदारी नसून ती शिक्षकाची आहे, असे प्रतिपादन आमदार चरण वाघमारे यांनी केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक २ येथे 'माझी मुलं, माझी शाळा' या उपक्रमांतर्गत शालेय स्नेह संमेलन उद्घाटन आमदार चरण वाघमारे यांचे हस्ते व जिल्हा परिषद अध्यक्ष वंदना वंजारी यांच्या अध्यक्षतेत झाले. प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी विभावरी पडोळे, केंद्रप्रमुख जयंत उपाध्ये, थारनोद डाकरे, चेतन डांगरे, चांगदेव रघुते, सुनीता बोंदरे, महादेव मते, घनश्याम बोंदरे, मिलिंद धारगावे, कैलाश कारेमोरे, राजू केवट, बाबूलाल बोंदरे उपस्थित होते. यावेळी राजू कारेमोरे यांनी शाळेच्या प्रवेशासाठी शारदा मातेची दान दिलेल्या मूर्तीचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी वाघमारे यांनी शाळेतील भौतिक सुविधा अंतर्गत इमारत व बगीचे तयार करण्याबरोबर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेत ज्ञानाचे बगिचे तयार झाले पाहिजे असे सांगितले. जिल्हा परिषद अध्यक्ष वंदना वंजारी यांनी विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना सांस्कृतिक कार्यक्रमातून जशी चालना मिळते, त्याप्रमाणे शैक्षणिक प्रगती दिसायला पाहिजे असे सांगितले.
संचलन विठ्ठल चचाणे, प्रास्ताविक मुख्याध्यापक फंदू धुर्वे व आभार बाबूलाल बोंदरे यांनी मानले. कार्यक्रमास सहायक शिक्षिका यमुना आकरे, उज्ज्वला टिचकुले, वनमाला निनावे, नलिनी मेश्राम, नरेश कोल्हे, नाझिया शेख, रंजना लिल्हारे, सय्यद माटे, वैभव ठाकूर, सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख पूर्वा शेंडे, ओमप्रकाश शेंडे, अल्का बुरबादे, वीणा नागलवाडे, अंजना सिंधीमेश्राम, निशा बोंदरे, गीता माटे, अनिता रामटेके, नंदा पटले, सपना बनोटे, स्वाती साठवणे उपस्थित होत्या. (वार्ताहर)