शिक्षकाने केले महिलेचे 'शीलहरण'
By Admin | Updated: September 29, 2014 00:37 IST2014-09-29T00:37:50+5:302014-09-29T00:37:50+5:30
प्रेमाच्या जाळ्यात ओढून महिलेला विविधांगी प्रलोभने दिली. यात आयुष्यभर साथ देण्याच्या आणाभाका देऊन महिलेचे सर्वस्व लुटणाऱ्या शिक्षकाने 'तो मी नव्हेच'ची भूमिका घेतली. यामुळे पीडितेने

शिक्षकाने केले महिलेचे 'शीलहरण'
भंडारा : प्रेमाच्या जाळ्यात ओढून महिलेला विविधांगी प्रलोभने दिली. यात आयुष्यभर साथ देण्याच्या आणाभाका देऊन महिलेचे सर्वस्व लुटणाऱ्या शिक्षकाने 'तो मी नव्हेच'ची भूमिका घेतली. यामुळे पीडितेने पोलिसात तक्रार दाखल केली. यावरून 'त्या' शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पवनी तालुक्यातील अड्याळ पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका गावातील शाळेत सहायक शिक्षक असलेल्या दिनेश विनायक मोटघरे (२७) याचे विरूध्द गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पीडितेने अड्याळ पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून, दिनेशने पीडित महिलेला २०११ मध्ये प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला आयुष्यभर जीवन जगण्याचे वचन दिले. यामुळे पीडित व दिनेश यांचे प्रेमसंबंध दृढ झाले. यात लग्नाचे आमिष दाखवून दिनेशने वेळोवेळी पीडितेवर तिच्या इच्छेविरूध्द २०१४ पर्यंत लैंगिक अत्याचार केला. यानंतर दिनेशने 'तो मी नव्हेच'ची भूमिका घेतल्याने पीडितेने त्याचा पिच्छा सोडला नाही. यात दोघांमध्ये खटके उडू लागल्याने दिनेशने तिला जीवे मारण्याची धमकी दिली.
अशा आशयाची तक्रार पीडित महिलेने अड्याळ पोलीस ठाण्यात दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी दिनेशविरुध्द कलम ३७६ (२) (फ), ५०६ भादंवि अन्वये गुन्हे नोंदविले आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोरे करीत आहे. विद्यार्जनाचे पवित्र कार्य करून भावी पिढी निर्माण करण्याची जबाबदारी असलेल्या शिक्षकाने असे कृत्य केल्याने अड्याळ परिसरात सध्या चर्चेला उधाण आले आहे. (शहर प्रतिनिधी)