शिक्षक धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर

By Admin | Updated: November 1, 2015 00:34 IST2015-11-01T00:34:36+5:302015-11-01T00:34:36+5:30

खडू आणि फळा सांभाळून देशाची भावी पिढी घडवीणारे शिक्षक तसे शांत व शिस्तप्रिय म्हणून ओळखले जातात.

The teacher fell on the Collector's office | शिक्षक धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर

शिक्षक धडकले जिल्हाधिकारी कार्यालयावर

भंडारा : खडू आणि फळा सांभाळून देशाची भावी पिढी घडवीणारे शिक्षक तसे शांत व शिस्तप्रिय म्हणून ओळखले जातात. मात्र, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाला शासनाकडून दाद मिळत नसल्याने शिक्षकांना आंदोलनाचे (मोर्चा) हत्यार उपसावे लागल्याचा प्रकार भंडारा येथे शनिवारला बघायला मिळाला.
शिक्षणाच्या गुणवत्तेचा विचार करून मुलांना शिक्षण देण्यासाठी भौतिक सुविधांची गरज आहे. असे असतानाही शिक्षकांना अशैक्षणिक कामात जुंपण्यात येत आहे. यासोबतच शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद यांच्या नेतृत्त्वात हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य पदविधर शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य केंद्र प्रमुख संघटना व उच्चश्रेणी मुख्याध्यापक संघ, नगर पालिका शिक्षक संघाचा यात समावेश होता. (शहर प्रतिनिधी)

या मागण्यांचा आहे समावेश
३२ विविध मागण्यांना घेऊन हा मोर्चा काढण्यात येणार आहे. प्रमुख मागण्यांमध्ये शिक्षकांना जुनी पेंशन योजना लागू करावी, आंतरजिल्हा व राज्यस्तरावरील बदलीचा प्रश्न सोडवावा, शिक्षक पदनिर्धारणाच्या निकषामध्ये सुधारणा करावी, शिक्षकांना बीएलओ तसेच विविध सर्वेक्षण शाळाबाह्य कामातून वगळावे, शाळा वेतन प्रणालीत शिक्षक पतसंस्था, बँका, एल.आय.सी. कपातीची तरतूद करावी, आपसी बदल्या विनाअट कराव्यात आदी मागण्यांचा समावेश आहे.
शिक्षकांच्या हाती मागण्यांचे फलक
शेकडो शिक्षकांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोर्चात सहभागी शिक्षकांच्या हातात त्यांच्या मागण्यांचा लिखीत फलक होता. एखाद्या कार्यक्रमाची शाळेकडून जशी विद्यार्थ्यांच्या सहभागाची प्रभातफेरी काढण्यात येते व त्यावेळी विद्यार्थ्यांच्या हातात फलक बघायला मिळते. तसाच प्रकार आज शिक्षकांच्या हातात दिसल्याने मोर्चातील फलकधारी शिक्षक सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र ठरले.

Web Title: The teacher fell on the Collector's office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.