आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांचे उपोषण

By Admin | Updated: May 17, 2016 00:19 IST2016-05-17T00:19:15+5:302016-05-17T00:19:15+5:30

आंतरजिल्हा बदलीसह अन्य न्याय मागण्यांचाही बाहेर जिल्ह्यात कार्यरत शिक्षकांनी आज सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे.

Teacher fasting for inter-district transfer | आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांचे उपोषण

आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांचे उपोषण

साखळी उपोषणाला सुरुवात : पहिल्या दिवशी ७० शिक्षकांचा सहभाग
भंडारा : आंतरजिल्हा बदलीसह अन्य न्याय मागण्यांचाही बाहेर जिल्ह्यात कार्यरत शिक्षकांनी आज सोमवारपासून जिल्हा परिषदेसमोर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. पहिल्या दिवशी या उपोषणात ७० शिक्षकांनी सहभाग घेतला आहे.
शिक्षक सहकार संघटना भंडाराच्या माध्यमातून शिक्षकांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे. भंडारा जिल्ह्यातील शेकडो शिक्षक महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यात मागील १० ते २० वर्षांपासून सेवा करित आहेत. दरम्यान ते कुटूंबापासून दुर असल्याने मोठ्या अडचणी निर्माण होत आहे. यात अपंग, विधवा, परित्यक्त्या, अटशिथील, एकतर्फी, पती-पत्नी एकत्रीकरण आदी अनेक प्रकारच्या शिक्षकांचा समावेश आहे. शासन निर्णयानुसार रिक्त पदावर सेवा ज्येष्ठतेनुसार सामावून घेण्याची तरतूद आहे. भंडारा जिल्हा परिषदेने अद्याप कोणतीही प्रक्रिया करण्यात सहकार्य केलेले नाही. शिष्टमंडळाने मुख्याधिकार, शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद अध्यक्ष, शिक्षण सभापतींना निवेदन दिले आहे. आंतरजिल्हा बदलीच्या प्रक्रियेतील शिक्षकांनी साखळी उपोषण सुरु केले आहे. या उपोषणाला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे मुबारक सैय्यद, महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीचे दिक्षीत, शिक्षण परिषदेचे विभागीय अध्यक्ष फडके, के. के पंचबुध्दे आदीनी पाठींबा दिला आहे. शिक्षकांच्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाही. तोपर्यंत साखळी उपोषण सुरु राहील अशा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष संदीप खार्डे, कैलास चव्हाण, दामोदर डहाडे, अरविंद बारई, सी. एफ. बिसेन, एस. डी. बारसागडे, एस. एस. झंझाड, एस.डी. सिरसाम, डी. एम. मुळे, डी. एस. खाके, सुरेश गडपायले आदीनी दिले आहे.
(शहर प्रतिनिधी)

Web Title: Teacher fasting for inter-district transfer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.