शिक्षक बुडणाऱ्या जहाजमधील प्रवासी
By Admin | Updated: September 25, 2014 23:19 IST2014-09-25T23:19:14+5:302014-09-25T23:19:14+5:30
शिक्षकांची स्थिती ही टायटॅनिक जहाजात बुडालेल्या प्रवाशासारखी आहे. सध्या शिक्षणाचे विशाल जहाज बुडाले नसले तरी ते यात प्रवाशासाठी बसलेल्या प्रवाशांना सुखरुप नेऊ शकत नाही अशी अवस्था आहे.

शिक्षक बुडणाऱ्या जहाजमधील प्रवासी
वरठी : शिक्षकांची स्थिती ही टायटॅनिक जहाजात बुडालेल्या प्रवाशासारखी आहे. सध्या शिक्षणाचे विशाल जहाज बुडाले नसले तरी ते यात प्रवाशासाठी बसलेल्या प्रवाशांना सुखरुप नेऊ शकत नाही अशी अवस्था आहे. शिक्षणाच्या या जहाजात प्रवास करणाऱ्यांनी जगाला ज्ञान देण्याचे स्वप्न पाहले. पण त्यांच्या पूर्ततेसाठी असलेली अज्ञानी सरकारी यंत्रणा व असंघटीत प्रवाशामुळे शिक्षकाची वाईट अवस्था आहे. ते यातून बाहेर पडले तर बुडणार व प्रवासादरम्यान ही बुडणार हे आता नक्की झाले आहे. यापासून बचाव करायचा असेल तर सर्वोत्तम शिक्षण देण्यासाठी झटणे व अधिकार प्राप्तीसाठी संघटीत होण्याचे आवाहन शिक्षक आमदार नागो गाणार यांनी केले.
महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा भंडाराच्या वतीने आयोजित मोहाडी तालुका शिक्षक मेळाव्यात ते बोलत होते. या मेळाव्यात तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागाच्या १०० च्या वर शिक्षकांनी हजेरी लावली होती. अध्यक्ष म्हणून विभागीय अध्यक्ष डॉ.उल्हास फडके व प्रमुख पाहुणे म्हणून अशोक तेलपांडे, अशोक वैद्य, जिल्हाध्यक्ष अशोक वैद्य, अंगेश बेहलपाडे व राज्य महिला आघाडी प्रमुख पूजा चौधरी उपस्थित होते.
यावेळी सर्व विभागाच्या शिक्षकांच्या समस्या, गुणवत्ता वाढ, कलम २५ व, कलम २६ अ, जि.प. कर्मचाऱ्याचे विलंबाने होणारे वेतन, शिक्षकांचे समायोजन, कनिष्ठ महाविद्यालयाचे अतिरिक्त ठरलेले शिक्षकाचे समायोजन यावर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.उल्हास फडके व यांनी उत्तरे दिली. शिक्षक आमदार म्हणून नागो गाणार यांनी शासन दरबारी शिक्षकांच्या समस्या सोडविण्याकरिता केलेले प्रयत्न व त्या प्रयत्नांना आलेले यशाचे पाढा वाचून सांगून शिक्षण क्षेत्रात वाढलेला भ्रष्टाचार रोखण्यासाठी पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्यांना एन्टी करप्शन ब्युरोच्या मार्फत पकडून द्या, त्यांच्यावर हक्कभंग प्रस्ताव आणणार, अशी माहिती त्यांनी दिली. संचालन प्रा.जितेंद्र टिचकुले व आभार प्रा.शशांक चोपकर यांनी मानले. कार्यक्रमात गुणवंत क्षीरसागर, प्रा.ईश्वर चव्हाण, मुकेश कुर्झेकर, गणेश सार्वे, प्रा.प्रशांत धकाते, माधुरी घोडेस्वार, संदीप बचेरे, प्रा.रविंद्र धुर्वे, दोनाडकर, प्रा.प्रेमा बेदरकर, सुधाकर लोणारे, संतोष चेटुले, एस.एम. लंजे, प्राचार्य अशोक गजभिये, प्राचार्य दयाळनाथ माळवे, प्रा.टिंगणे, ऋषीकेश डोंगरे, कामडी, रविंद्र गायकी, प्रा.नंदा उके, शैलेश कोकाटे, युवराज गुंजेवार व राजेश रामटेके उपस्थित होते. (वार्ताहर)