संघटनेच्या बंडखोरांना धडा शिकवा
By Admin | Updated: October 15, 2015 00:39 IST2015-10-15T00:39:37+5:302015-10-15T00:39:37+5:30
राजकीय पक्षांच्या दबावात काम करणाऱ्या संघटना व बंडखोरांना धडा शिकविण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या पाठीशी राहा.

संघटनेच्या बंडखोरांना धडा शिकवा
डायगव्हाणे यांचे प्रतिपादन : विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ कार्यकारिणीची सभा
साकोली : राजकीय पक्षांच्या दबावात काम करणाऱ्या संघटना व बंडखोरांना धडा शिकविण्यासाठी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाच्या पाठीशी राहा. शिक्षकांच्या समस्यांना वाचा फोडणारी संघटना उरलेली नाही, म्हणून प्रांतिय निवडणुकीत शिक्षक संघाच्या उमेदवारांना निवडून देणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन माजी आमदार व्ही.यू. डायगव्हाणे यांनी केले.
मार्तंड पाटील कापगते विद्यालयात आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार व्ही.यु. डायगव्हाणे हे होते. अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते, सुधाकर आजबले, राजेश धुर्वे, टेकचंद मारबते, श्रीधर खेडीकर, आनंद कारेमोरे, जगदीश जुनघरे उपस्थित होते. याप्रसंगी नवनियुक्त जिल्हा परिषद सदस्य होमराज कापगते यांचा विदर्भ माध्यमिक शिक्षक संघातर्फे शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. अतिथींनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना निवडण्याचे आवाहन केले. या सभेला भंडारा जिल्ह्यातून लाखनी, भंडारा, लाखांदूर, मोहाडी, तुमसर, साकोली येथील शिक्षक, शिक्षिका उपस्थित होते. सभेचे संचालन शिवदास लांजेवार यांनी तर आभार जिल्हाउपाध्यक्ष श्रीधर खेडीकर यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)