विशाल रणदिवे।लोकमत न्यूज नेटवर्कअड्याळ : मृग नक्षत्र प्रारंभ होऊन दहा दिवसांचा कालावधी लोटला तरी अद्याप पावसाचा पत्ता नाही. दररोज प्रचंड उन तापत आहे. अड्याळ परिसरातील तलावांना भेगा पडल्या असून मत्स्य व्यवसायीक अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांसह सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा लागली आहे.मार्च महिन्यापासून प्रचंड उन तापत आहे. या उन्हामुळे अड्याळ परिसरातील बहुतांश सर्व तलाव आटले आहेत. आता तर तलावाला तडे गेले आहेत. दरवर्षी जून महिन्यात पावसाला प्रारंभ होतो. मात्र यावर्षी अर्धा जून महिना संपला तरी पावसाचा पत्ता नाही. हवामान खाते अंदाज वर्तवित आहेत. परंतु अद्यापही अड्याळ परिसरात पाऊसच झाला नाही. शेतीची सर्व कामे खोळंबली आहेत. त्यातच अड्याळ परिसरातील सर्व लहान मोठे तलाव कोरडे पडले आहेत. परंतु या संधीचा फायदा कुणीही करवून घेतला नाही. खोलीकरण, गाळ उपसा या काळात करण्याची चांगली संधी होती.तलाव आटल्याने मत्स्य व्यवसायीकांचे मोठे नुकसान झाले. गत महिन्यात पाण्याअभावी तडफडून माशांचा मृत्यू झाला. लाखो रुपयांचे मासे मृत्यूमुखी पडले. या सर्वांना निसर्गाच्या लहरीपणाचा फटका बसत आहे. अड्याळ परिसरात शेतकऱ्यांनी बि बियाणे, खतांची खरेदी केली आहे. प्रतीक्षा आहे ती केवळ पावसाची. परंतु पाऊस केव्हा कोसळेल हे मात्र कुणीही सांगत नाही.शेतकरी संकटातदरवर्षी जून महिन्यात पावसाला सुरुवात झाली की पºहे टाकण्याचे काम सुरु होते. परंतु यंदा जून महिना अर्धा संपला तरी पावसाचा पत्ता नाही. पावसासाठी सर्वांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. पाऊस लांबल्यास भातपिकावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.
अड्याळ परिसरातील तलावांना भेगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:18 IST
मृग नक्षत्र प्रारंभ होऊन दहा दिवसांचा कालावधी लोटला तरी अद्याप पावसाचा पत्ता नाही. दररोज प्रचंड उन तापत आहे. अड्याळ परिसरातील तलावांना भेगा पडल्या असून मत्स्य व्यवसायीक अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांसह सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा लागली आहे.
अड्याळ परिसरातील तलावांना भेगा
ठळक मुद्देपावसाची प्रतीक्षा : मत्स्य व्यवसायिक अडचणीत