शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता-नेता विजयने जाणीवपूर्वक उशीर केल्याने झाली मोठी चेंगराचेंगरी; मृतांची संख्या ४१ वर
2
लडाखला परके करताय, वांगचुक यांना सोडा; कारगिल डेमोक्रॅटिक अलायन्सची मागणी
3
शेतकऱ्यांचं मरण : महिनाभरात २६ लाख हेक्टरला फटका; खरिप हंगामातील ५२ लाख हेक्टरवरील पिके गेली पाण्यात
4
सायबर फसवणुकीवर आता एआयचा लगाम; मोबाइल नंबर व आयपी ॲड्रेस होतील ब्लॉक
5
अखेर 'त्या' आईने लढाई जिंकली, २० वर्षांनंतर ६० लाखांची भरपाई; नेमकं प्रकरण काय?
6
ट्रम्प बनले व्हिलन! केली नवी घोषणा; चित्रपटांवरही लावला १००% टॅरिफ
7
चांदी दीड लाख रूपये किलो, सप्टेंबरमध्ये २१,५२७ रुपयांची झेप; सोन्याचीही ११ हजारांची उडी
8
Asia Cup 2025: मोहसीन नक्वी टीम इंडियाला ट्रॉफी द्यायला झाले तयार, पण आता ठेवली 'ही' एक अट
9
तब्बल २२ वाहने चोरणाऱ्या आंतरराज्य चोरट्याला सांगलीत अटक; १६ लाखांचा मुद्देमाल जप्त
10
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
11
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
12
पंतप्रधान मोदी करणार ‘मुख्यमंत्री अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ कार्यक्रमाचे उद्घाटन
13
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
14
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
15
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
16
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
17
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
18
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
19
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
20
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...

टँकरमुक्त जिल्ह्यात अवर्षणाची चिन्हे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 22:44 IST

इंद्रपाल कटकवार ।आॅनलाईन लोकमतभंडारा : संसाधनांच्या बाबतीत विपुल समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात मागील काही दशकांपेक्षा आमागी वर्षात जिल्हावासियांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. कमी पर्जन्यमानामुळे कधी नव्हे त्या जवळपास जिल्ह्यातील ६५३ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाईची निवारणार्थ कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. परिणामी टँकरमुक्त जिल्ह्यात अवर्षणाची चिन्हे दिसू लागली आहेत, असे म्हटल्यास ...

ठळक मुद्दे६५३ गावांमध्ये होणार पाणीटंचाईची कामे : कमी पर्जन्यमानाचा फटका

इंद्रपाल कटकवार ।आॅनलाईन लोकमतभंडारा : संसाधनांच्या बाबतीत विपुल समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात मागील काही दशकांपेक्षा आमागी वर्षात जिल्हावासियांना पाणीटंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. कमी पर्जन्यमानामुळे कधी नव्हे त्या जवळपास जिल्ह्यातील ६५३ गावांमध्ये संभाव्य पाणीटंचाईची निवारणार्थ कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. परिणामी टँकरमुक्त जिल्ह्यात अवर्षणाची चिन्हे दिसू लागली आहेत, असे म्हटल्यास वावगे ठरू नये.एकेकाळी तलावांचा जिल्हा म्हणून अख्ख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला भंडारा जिल्हा आज दुसऱ्या क्रमाकांवर पोहचलेला आहे. माजी मालगुजारी तलावांसह अन्य तलावांच्या देखरेखीकडे दुर्लक्ष, पाण्याची नासाडी व जल पुर्नभरणाच्या कामांकडे सातत्त्याने दुर्लक्ष होत गेले. दुसरीकडे वातावरणातील बदल, परिणामी निसर्गचक्र बदलल्यामुळे जिल्ह्यात पावसाने सरासरीही गाठलेली नाही. परिणामी जिल्हा प्रशसानाने संभाव्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विविध उपाययोजना तीन टप्प्यांमध्ये प्रस्तावित केल्या आहेत.दोन टप्प्यात होणार कामेजिल्हा हा टँकरमुक्त असल्याने टँकर बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा करण्याबाबत कुठलेही नियोजन करण्यात आलेले नाही. सदर नियोजनांतर्गत पहिल्या टप्प्यात जानेवारी ते मार्च या मध्ये ७८ लक्ष ७३ हजारांचा खर्च पाणीटंचाईच्या निवारणार्थ खर्च केल्या जाणार आहे. विशेष म्हणजे पहिला टप्पा डिसेंबर महिन्यातच संपणार आहे. एप्रिल ते जून या तीन महिन्यांच्या कालावधीत संभाव्य पाणी टंचाई निवारणार्थ बृहत आराखड्यानुसार २६४ गावांमध्ये कामे केली जाणार आहेत.१ कोटी १२ लाखांचा खर्चसंभाव्य पिण्याचे पाणी टंचाई निवारणार्थ जानेवारी ते जून या दोन टप्प्यांतर्गत ६५३ गावांमध्ये कामे केली जाणार आहेत. यात विहिरी खोल करणे, गाळ उपसणे, खासगी विहिरींचे अधिग्रहण करणे, नळयोजनेची दुरुस्ती करणे, विंधन विहिरींची दुरुस्ती करणे आदी कामांचा समावेश आहे. यासाठी १ कोटी १२ लाखांचा खर्च अपेक्षित असल्याचे सुत्रांकडून सांगण्यात आले.

यावर्षी कमी पर्जन्यमान बरसल्यामुळे पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता यावर्षी जलपुनर्रभरणाकडे अधिक लक्ष दिले जाणार आहे. विशेष म्हणजे सर्वात प्रथम पिण्याचे पाणी उपलब्ध करण्यावर जिल्हा प्रशासनाचा उद्देश आहे. त्यानंतर शेतीव्यवसायासाठी पाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे. रोहयोच्या माध्यमातूनही जलस्त्रोत निर्माण करण्यावर भर दिला जात आहे.-मनिषा दांडगे,उपजिल्हाधिकारी, रोहयो, भंडारा.