जीएनटी कॉन्व्हेंटमध्ये तान्हा पोळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:42 IST2021-09-09T04:42:35+5:302021-09-09T04:42:35+5:30

भंडारा : गणेशपूर येथील जीएनटी कॉन्व्हेंट येथे तान्हा पोळ्याचा कार्यक्रम कॉन्व्हेंटच्या पटांगणात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुबोध ...

Tanha hive in GNT convent | जीएनटी कॉन्व्हेंटमध्ये तान्हा पोळा

जीएनटी कॉन्व्हेंटमध्ये तान्हा पोळा

भंडारा : गणेशपूर येथील जीएनटी कॉन्व्हेंट येथे तान्हा पोळ्याचा कार्यक्रम कॉन्व्हेंटच्या पटांगणात उत्साहात पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुबोध शिक्षण संस्थेचे सचिव जी. एन. टिचकुले कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका उपस्थित होत्या. याप्रसंगी रिदान बनसोड, राशी गाढवे, नक्ष बांते, प्रियांशू रायपूरकर, रियान खोब्रागडे, आर्वी चकोले, सार्थक काळे, पूर्वी बांते, काव्या भोंगाडे, आद्या बांते, मानस चामट, निहारिका बारई, तोषित पाटील, अंशिका खंडाते, श्रावण्या गभने, अर्षिता माकडे इ. विद्यार्थ्यांनी सजवलेल्या नंदीसह कार्यक्रमात उत्साहाने सहभाग घेतला. संचालन रंजू सर्वे यांनी तर आभार प्रदर्शन सोनाली भेलावे यांनी केले. कार्यक्रमाकरिता प्रीती ब्राह्मणकर, फाझेला शेख, योगिता वाडेकर, सरिता लाखाडे, श्वेता खापेकर, लक्ष्मी मस्के, निलोफर उके, हेमंतकुमार फटे, पुष्पा डहारे,पल्लवी वानखेडे,लीना मेश्राम,मोनाली सेलोकर, कावेरी पारधी शारदा साखरे यांनी सहकार्य केले.

Web Title: Tanha hive in GNT convent