तमाशा समाजप्रबोधनाचे माध्यम
By Admin | Updated: November 1, 2014 22:49 IST2014-11-01T22:49:09+5:302014-11-01T22:49:09+5:30
पूर्वीच्या काळापासून महाराष्ट्रात तमाशांनी समाज प्रबोधनाची कार्य केलीत. विविध वाईट चालिरीती, प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा, बुवाबाजी यांच्यावर कडाडून टीका केली. मात्र कालौघात तमाशाकडे समाजाचा

तमाशा समाजप्रबोधनाचे माध्यम
करडी (पालोरा) : पूर्वीच्या काळापासून महाराष्ट्रात तमाशांनी समाज प्रबोधनाची कार्य केलीत. विविध वाईट चालिरीती, प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा, बुवाबाजी यांच्यावर कडाडून टीका केली. मात्र कालौघात तमाशाकडे समाजाचा पाहण्याचा कल बदलला आहे. पालोर येथील हौशी तरुणांनी तमाशाचे आयोजन करून पुन्हा या कलेला वाढविण्याचे काम केले आहे. अतिशय अभिमानाची बाब आहे. विविध मंडळांनी यातून प्रेरणा घेऊन कला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करावे, असे प्रतिपादन काशिनाथ ढोमणे यांनी केले.
पालोरा येथे पळसटोली व सिव्हील लाईन यांचे सौजन्याने मंडईनिमित्त आयोजित तमाशाच्या कार्यक्रमाचे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
पालोरा येथे २० वर्षानंतर राष्ट्रीय संगीत खडा तमाशाचे आयोजन पार पडले. सुरुवातीपासूनच रसिकांमध्ये तमाशा पाहण्याची हुरहूर लागली होती. जांभोरा येथील शाहीर अरुण ऊर्फ अरविंद बंसोड यांचे नाव जिल्ह्यातील कानाकोपऱ्यात गाजत असताना त्यांचे कार्यक्रम परिसरातील मोठ्या गावात झालेले नव्हते. त्यामुळे सहाजिकच गावकऱ्यांच्या मनात उत्सुकता होती. ती पूर्ण झाली. मंडईच्या निमित्ताने. तमाशाचा फड सुरु होताच प्रेक्षकांची अलोट गर्दी जमा झाली. वृध्द, तरुण, प्रतिष्ठित नागरिकांबरोबर महिला व तरुणांनी हजेरी लावली. गर्दी सांभाळताना आयोजकांना कठीणाईचा सामना करावा लागत होता. तमाशातील नर्तकी असलेले तरुण गोरगोमटे व हुबेहुब तरुणीसारखे दिसत असल्याने अनेक तरुणांना मोबाईल, कॅमेरामध्ये त्यांचा फोटो घेण्याचा मोह आवरता आला नाही. तमाशा कार्यक्रमाचे उद्घाटकस्थानी केसलवाडा जि.प. प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक घनश्याम समरीत तर अध्यक्षस्थानी काशिनाथ ढोमणे होते. अतिथी म्हणून सरपंच माला मेश्राम, उपसरपंच गणेश कुकडे, माजी उपसरपंच महादेव बुरडे, रोजगार सेवक बळीराम अतकरी, भैय्या कनोजकर, हनुमान देवस्थान कमेटी सचिव विश्वनाथ हाडगे, दुर्योधन मरमडे, पोलीस पाटील वीरेंद्र रंगारी, उमेश भोयर, ग्रा.पं. सदस्य सुनिल पेंदाम, भोजराम तिजारे, धनराज तिजारे, दुर्गादास वनवे, हितेश बुरडे, देवदास गहाणे, निलज बुजचे सरपंच महादेव पचघरे, सहाय्यक फौजदार अश्विन मेहर, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष मनोहर रोटके, संदिप खोब्रागडे, विजय मेश्राम, कैलाश मेश्राम, बावणे, कलगी पार्टीचे शाहीर अरविंद ऊर्फ अरुण बंसोड, शाहीर राजहंस आणि संपूर्ण चमू प्रामुख्याने हजर होते. कार्यक्रमासाठी मंडळाचे रवी कुकडे, युवराज गोमासे, उमेश तुमसरे, रमेश ठवकर, लवकुश कुकडे, शाम काळे, महाराज तिजारे, मनोहर तिजारे, भोयर यांनी सहकार्य केले. (वार्ताहर)