कामगारांच्या प्रश्नावर उध्दव ठाकरेंशी चर्चा

By Admin | Updated: June 13, 2016 02:16 IST2016-06-13T02:16:32+5:302016-06-13T02:16:32+5:30

युनिव्हर्सल कारखाना सुरू करा अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही, अशी टोकाची भूमिका घेत शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी

Talk with Uddhav Thackeray on the issue of workers | कामगारांच्या प्रश्नावर उध्दव ठाकरेंशी चर्चा

कामगारांच्या प्रश्नावर उध्दव ठाकरेंशी चर्चा

प्रकरण युनिव्हर्सल कारखान्याचे : उद्योगमंत्र्यांनाही भेटले राजेंद्र पटले
भंडारा : युनिव्हर्सल कारखाना सुरू करा अन्यथा आंदोलनाशिवाय पर्याय नाही, अशी टोकाची भूमिका घेत शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या भूमिकेबाबत स्पष्ट निर्देश जिल्हाध्यक्ष राजेंद्र पटले यांना दिले आहेत. मुंबई येथे तीन दिवसांपूर्वी झालेल्या चर्चेनंतर १३ जूनला कंपनी प्रशासनासोबत होणाऱ्या बैठकित हा मुद्दा पुन्हा तापणार आहे.
शिवसेनाद्वारे १ जूनला आंदोलन माडगी चौकात करण्यात आले. या आंदोलनात २० वर्षापासून फेरो मॅगनीज प्लांट बंद असल्याचा राग जनतेमध्ये दिसून आला. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले यांच्या या थरारक आंदोलनाची मुंबई मध्ये दखल घेण्यात आली. उद्या १३ जूनला विशेष बैठक नेत्रावाला यांच्यासोबत होणार आहे. जर या बैठकीत कामगार व जनतेच्या हिताचा निर्णय जर निघाला तर मोठे आंदोलन उभारण्याचा इशारा दिला आहे.
या सर्व बाबींवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे व उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याशी जिल्ह्यध्यक्ष राजेंद्र पटले यांनी चर्चा केली. या प्लांटविषयी टोकाची भूमिका घेणारा शिवसेनाच पक्ष पुढे आला. प्रत्यक्षात विरोधात असलेले पक्ष सुद्धा आंदोलन करू शकत होते. परंतु आंदोलने केली नाहीत. जनतेवर होत असलेला अन्याय खपवून घेणार नाही. २० वर्षांपासुनचा हा विषय शिवसेनेनी हातात घेतला असल्याची प्रतिक्रीया राजेंद्र पटले यांनी दिली. (प्रतिनिधी)

Web Title: Talk with Uddhav Thackeray on the issue of workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.