धानासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

By Admin | Updated: November 22, 2014 00:17 IST2014-11-22T00:17:45+5:302014-11-22T00:17:45+5:30

शासकिय आधारभूत धान खरेदी केंद्राच्या विविध समस्या सोडविण्यासाठी विधान परिषदेच्या नागपुर येथील अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री

Talk to the chief minister | धानासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

धानासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार

साकोली : शासकिय आधारभूत धान खरेदी केंद्राच्या विविध समस्या सोडविण्यासाठी विधान परिषदेच्या नागपुर येथील अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत धान खरेदी केंद्राच्या पदाधिकाऱ्याच्या बैठकीचे आयोजन करुन चर्चा करण्यात येईल व धान खरेदी केंद्र व शेतकऱ्याच्या समस्या सोडविण्यात येतील असे मत खासदार नाना पटोले यांनी श्रीराम सहकारी भात गिरणी साकोली येथे आयोजित शासकिय आधारभूत धान खरेदी केंद्राच्या शुभारंभप्रसंगी व्यक्त केले.
यावेळी आमदार बाळा काशिवार, प्राचार्य होमराज कापगते, भातगिरणीचे अध्यक्ष पतीराम कापगते, उपाध्यक्ष हरिदास समरीत, व्यवस्थापक गोपाल समरीत, भोजराम कापगते, संचालक जासवंत कापगते, मनोहर कापगते, जानकीराम कापगते, परसराम कापगते, जगदीश समरीत, देवचंद टेकाम, वासुदेव सुतार, वच्छलाबाई कापगते, लीलाबाई कापगते, शकुंतला समरीत, पैकनदास मेश्राम, चुन्नीलाल कापगते, मार्तंड लांजेवार उपस्थित होते.
खा. पटोले म्हणाले की, या भागातील सहकारी स्वस्त धान्य दुकानात पंजाब प्रांतातुन तांदळाची पुर्तता केली जाते. यात विविध अडचणी निर्माण होतात. याकरिता काही शासकिय अधिकारी जबाबदार असुन त्यांचा रॅकेट सक्रिय आहे. छत्तीसगढ प्रांतातून तांदळाची पुर्तता झाल्यास सोयीचे होऊ शकेल.
धान खरेदी केंद्राकडून शेतकऱ्यांना धानाचे चुकारे देण्यात होणाऱ्या विलंबासाठी मार्केटिंग फेडरेशचे अधिकारी जबाबदार आहेत. या कार्यप्रणालीत सुधार करण्यासाठी केंद्र व राज्याचे नवीन सरकार प्रयत्नशील आहे.
यावेळी कार्यक्रमाला रतिराम कापगते, मुरलीधर कापगते, हरिशचंद्र लंजे, अविराम गहाणे, पंढरी कापगते, अशोक गुप्ता, दयाराम समरीत, जगदीश कापगते, ओमकालू कापगते व परिसरातील शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Talk to the chief minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.