तलाठी कार्यालय भाड्याच्या घरात
By Admin | Updated: May 22, 2014 00:54 IST2014-05-22T00:54:42+5:302014-05-22T00:54:42+5:30
भंडारा जिल्ह्यातील बहुतांश तलाठी क ार्यालय हे भाड्याच्या घरात आहेत.

तलाठी कार्यालय भाड्याच्या घरात
मोहाडी : भंडारा जिल्ह्यातील बहुतांश तलाठी क ार्यालय हे भाड्याच्या घरात आहेत. याकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. शासनाला लाखो रुपयांचा महसूल गोळा करून देणारे कार्यालय म्हणून तलाठी कार्यालय मोलाची मदत करीत असते. मात्र याच तलाठी कार्यालयांची दैनावस्था झालेली आहे. बहुतांश तलाठी कार्यालये हे भाड्याच्या घरात चालत आहेत. शासन अनेक योजना राबवते. त्यामध्ये घरकूल योजना, इंदिरा आवास योजना यासह अनेक प्रकारच्या योजना राबवून अनेक बेघरांना व गरजू व्यक्तींना पाहण्यासाठी घर उपलब्ध करून देते. मात्र शासनाच्या अशा कार्यालयाकरिता शासनाची झोळी रिकामी असते. तलाठी कार्यालय हे शेतकर्यांया मदतीचे एक मुख्य केंद्र आहे. या कार्यालयाद्वारे शेतकर्यांना सातबारा, गाव नमुना आठ, उत्पन्नाचे दाखले, जमिनीचे मोजमाप तसेच दुष्काळ, अतवृष्टीने बाधित झालेल्या शेताची, घरांची नोंद घेऊन त्यांचे नुकसान शासनापर्यंंत पोहोचविण्याचा प्रथम कर्तव्य हे तलाठीच करतात. असे एक ना अनेक कामे हे तलाठी कार्यालयामार्फत केले जातात. मात्र त्या मानाने या कार्यालयामध्ये सोयी सुविधांचा अभाव दिसून येतो. शासनातर्फे या कार्यालयाचा कधी विचारच केला जात नाही. शासनाजवळ प्रत्येक गावात स्वत:चे भूखंड आहेत. या कार्यालयातर्फे कितीतरी महसूल गोळा केल जातो. तरी या भूखंडावर तलाठी कार्यालय बचविण्यासाठी प्रयत्न केले जात नाही. उलट इतर लोक शासकीय जागेवर अतिक्रमण करून पक्के घर बांधून घेतात. शासनाजवळ जागा व पैसा असताना हे कार्यालय बांधण्याची मानसिकता नसणे ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. एक टेबल, एक खुर्ची शेतकर्यांच्या नेहमी कामे पडणारा तलाठी कार्यालय शासनाच्या दुर्लक्षामुळे भकास स्वरुपात आढळतो. अनेक तलाठी कार्यालयात एक टेबल, एक खुर्ची, एक आलमारी असे स्वरुप असते. येणार्या शेतकर्यांना बसण्यासाठीही खुर्ची मिळत नाही. कदाचित हे कार्यालय सर्वाधिक शेतकर्यांशी निगडित असल्यानेच याची अशी स्थिती असावी. (शहर प्रतिनिधी)