तलाठी, मंडळ अधिकाऱ्याचे बेमुदत संप
By Admin | Updated: April 28, 2016 00:30 IST2016-04-28T00:30:45+5:302016-04-28T00:30:45+5:30
विदर्भ पटवारी संघ नागपूर व विदर्भ मंडळ अधिकारी संघ नागपूर यांच्या आदेशान्वये तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या मागण्या जोपर्यंत पुर्ण होत नाही,..

तलाठी, मंडळ अधिकाऱ्याचे बेमुदत संप
कार्यालयांना लागले कुलूप : संपाचा अनेकांना फटका
साकोली : विदर्भ पटवारी संघ नागपूर व विदर्भ मंडळ अधिकारी संघ नागपूर यांच्या आदेशान्वये तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या मागण्या जोपर्यंत पुर्ण होत नाही, तोपर्यंत बेमुदत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तालुक्यातील सर्वच तलाठी कार्यालयाला कुलूप लावण्यात आले असून तलाठ्याचे कामकाज बंद आहे. त्यामुळे नागरिकांना कामासाठी अडचण निर्माण झाली आहे.
गेल्या ३२ वर्षात राज्यातल्या तलाठी साज्याची पुर्नरचना केलेली नाही. याबाबद महसूल मंत्र्यांनी तलाठी साजे वाढवून देण्याची आश्वासन दिले होते. मात्र दिलेले आश्वासन पाठवण्यात आले नाही. त्यामुळे जोपर्यंत तलाठी साजांची व महसूल मंडळाची पुर्नरचना करून मंडळ अधिकारी यांचे कार्यालयाचे भाडे देण्यात यावे.
सात बारा संगणीकीकरण व ई फेरफारमधील अडचणी दूर करणे, तलाठी मंडळ अधिकारी यांना पायाभूत प्रशिक्षण देण्यात यावे, अवैध गौण खनिज वसुली या कामातून तलाठी संवर्गास वगळण्यात यावे. महसूल खात्यात पदोन्नतीसाठी त्रिस्तरीय पद्धतीचा अवलंब करण्यात यावा, सरळ सेवेची २५ टक्के पदे खात्याअंतर्गत कर्मचाऱ्यासाठी राखून ठेवण्यात यावी, निवृत्त वेतन योजनेबाबतच्या अडचणी दूर करण्यात याव्या या मागण्या जोपर्यंत मंजूर होत नाही तोपर्यंत हा संप असाच सुरू राहणार आहे.
यावेळी मंडळ अधिकारी आर.पी. निंबार्ते, मंडळ अधिकारी एस.एस. कारेमोरे, मंडळ अधिकारी एस.एम. बंसोड, तलाठी दिनेश सिडाम, शैलेश बिसेन, विजय हटवार, एच.जी. खोब्रागडे, डी.एस. शिंदे, नोमेश्वर मदनकर, ताराचंद मेश्राम, सुनिता साखरवाडे, यु.एन. भोयर, गीता मेश्राम, शेखर ठाकरे, नरेंद्र चवळे, लालचंद बावनकर, व्ही.के. मेश्राम, मंदा कारेमोरे, मनिषा उईके, सुनिल कासराळे उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)