शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics :"दोन ‘बंधू’ एकत्र येणार, त्यामुळे अनेकांच्या पोटात भीतीचा गोळा..."; सामनातून विरोधकांना डिवचले, संकेतही दिले
2
झारखंडच्या बोकारोमध्ये चमकम! सुरक्षा दलांनी ६ नक्षलवाद्यांना ठार केले
3
राज्य सरकार हिंदीचा प्रचार का करतंय?; २२ शैक्षणिक संघटनांचा हिंदी सक्तीला विरोध
4
Stock Market Today: ३४९ अंकांच्या तेजीसह उघडला Sensex, बँक निफ्टीचा रेकॉर्ड; रियल्टी-हेल्थकेअरमध्ये मोठी तेजी
5
‘अटी’तटीत अडकली ठाकरे युती, चर्चेचे गुऱ्हाळ सुरूच; मनसेची आक्रमक भूमिका
6
NAV म्हणजे नक्की काय हो? Mutual Fund मध्ये गुंतवणूक करत असाल तर हे माहितच हवं
7
महाराष्ट्रात सौर ऊर्जा क्रांती, राज्याला महत्त्वपूर्ण यश; ८,४५० मेगावॅट वीजनिर्मिती
8
Post Office ची कमालीची सेव्हिंग स्कीम; गुंतवणूक करा आणि महिन्याला २० हजारांचं पेन्शन फिक्स
9
काश्मीरमध्ये हाहाकार! ढगफुटीने तीन जणांचा मृत्यू; १०० हून अधिक लोकांना वाचवण्यात यश
10
"भारतातील निवडणूक प्रक्रियेत...’’, महाराष्ट्रातील मतदानाचा उल्लेख करत राहुल गांधींचं अमेरिकेत मोठं विधान
11
राज्यात हिंदीची सक्ती नाहीच, इतर भाषेचा पर्याय घेता येणार; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २१ एप्रिल २०२५: साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल
13
साहेब, तुमच्या लाडक्या बहिणीच्या मुलीने गळफास घेतला, त्या क्रूर नराधमांना शिक्षा द्या
14
दोन मुलांना मारून टाकणार, पेटवून घेणार; महिलेचा 'तो' ईमेल आणि विख्यात डॉक्टरांनी संपवलं जीवन
15
राज्यात उन्हाने होरपळ, उकाड्यानं नागरिक हैराण; उष्णतेच्या लाटेचा इशारा
16
"मोदीजी या लोकांना रोखले नाही, तर..."; निशिकांत दुबे यांच्या विधानावरून ओवेसींचा हल्लाबोल
17
'असा' शिक्षक विद्यार्थ्यांना काय शिकवणार?; शिक्षणाचा खेळखंडोबा म्हणजे देशाशी गद्दारी!
18
मुंबई विद्यापीठासाठी उघडले संशोधनाचे नवे दालन; आयआयटी-मुंबईच्या ‘हब’ संस्थेत समावेश
19
तारीख पे तारीखचा खेळ सुरू; यावर्षीही महापालिका निवडणुका होणार नाहीत..?
20
दोन टक्के व्याजासाठी विकासाला खीळ घालणे अमान्य; BMC आयुक्तांनी सांगितलं कारण...

४० हजारांची लाच घेताना जि.प. उपअभियंत्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 12:26 IST

Bhandara : जलशुद्धीकरण कामाचे बिल काढण्यासाठी केली होती ५ टक्क्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जलशुद्धीकरण केंद्रातील दोन कामांचे बिल काढण्यासाठी ५ टक्के कमिशनची मागणी करणाऱ्या व त्यासाठी ४० हजार रुपयांची लाच स्वीकारणाऱ्या प्रभारी उपअभियंत्याला शुक्रवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने अटक केली. सुहास पांडुरंग कुरंजेकर (५१ वर्षे) असे या वर्ग दोनच्या प्रभारी उपअभियंत्याचे नाव असून तो जिल्हा परिषदेच्या जलसंपदा यांत्रिकी विभागात कार्यरत आहे.

एसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ३७ वर्षीय कंत्राटदाराने चिखली आणि लेंडेझरी या दोन गावांतील जलशुद्धीकरण संदर्भातील कामे पूर्ण केली आहेत. या कामाचे ९ लाख ८० हजार रुपयांचे बिल त्यांनी विभागाकडे सादर केले. ते मंजूर होण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे, दोन्ही ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र, वर्क ऑर्डर, कामाचे फोटोग्राफ आदी कुरंजेकर याच्याकडे सादर केले. या संदर्भात कंत्राटदाराने १७फेब्रुवारीला त्याची भेट घेऊन बिलाबाबत विचारणा केली. मात्र या कामाच्या बिलावर सही करून बिल मंजूर करण्यासाठी एकूण रकमेच्या ५ टक्के कमिशनची अर्थात ४९ हजार रुपयांची मागणी केली.

कमिशनच्या नावाखाली लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने संबंधित कंत्राटदाराने २५ फेब्रुवारीला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली. या संदर्भात पंचासमक्ष पडताळणी केली असता उपअभियंता कुरंजेकर याने तडजोड करून ४० हजार रुपयांची मागणी पंचासमक्ष केल्याचे तपासात पुढे आले. यावरून सापळा रचून शुक्रवारी ही रक्कम देण्याचे ठरले. नियोजनानुसार, सुहास कुरंजेकर याने पंचासमक्ष कंत्राटदाराकडून ४० हजार रुपयांची रक्कम स्वीकारली. यादरम्यान त्याला अटक करण्यात आली. भंडारा पोलिसात सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. सक्षम अधिकारी या नात्याने जलसंपदा विभागाचे मंत्रालयातील सचिवांनाही हा प्रकार कळविण्यात आला आहे. पोलिस अधीक्षक दिगंबर प्रधान, अपर पोलिस अधीक्षक सचिन कदम, संजय पुरंदरे यांच्या मार्गदर्शनाखाली भंडाऱ्याचे पोलिस उपअधीक्षक डॉ. अरुणकुमार लोहार यांनी भडारा पथकासह ही कारवाई केली. 

घराची झडती...या कारवाईनंतर पथकाने उपअभियंत्याच्या घराचीही झडती सायंकाळी सुरू केली. वृत्त येईपर्यंत ही तपासणी सुरूच होती. अधिक चौकशीसाठी त्याचा मोबाइलही ताब्यात घेण्यात आला आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदCorruptionभ्रष्टाचार