पोलिसांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा
By Admin | Updated: September 5, 2016 00:46 IST2016-09-05T00:46:33+5:302016-09-05T00:46:33+5:30
मुंबई येथील वाहतूक पोलिस हवालदार विलास शिंदे व तुमसर येथील हवालदार राजू साठवणे यांना मारहाण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी...

पोलिसांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : पोलीस बॉईज संघटना
भंडारा : मुंबई येथील वाहतूक पोलिस हवालदार विलास शिंदे व तुमसर येथील हवालदार राजू साठवणे यांना मारहाण करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन पोलीस बॉईज संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
आज जे पोलिस देशासाठी, समाजासाठी अहोरात्र मेहनत करून आपले कर्तव्य बजावत असतात त्यांना जर असेच अत्याचाराला सामोरे जावे लागत असेल तर ते अत्यंत दुदैर्वी आहे. अशा घटनांमुळे पोलिसांच्या कुटुंबावर गदा येत आहे. पोलिस कर्मचारीच जर असुरक्षित असतील तर त्यांनी स्वताच्या संरक्षणाकरिता कुणाकडे जावे, असे मत यावेळी पोलिस बॉईज संघटनेच्या वतीने व्यक्त करण्यात आले.
या वेळी तुषार हटेवार, पंकज ठवकर, लक्ष्मीकांत भलावी, शशांक शेळके, शुभम मते, नमित सयाम, रजत कटरे, शुभम कटरे, सागर मते, शुभम मंदुरकर, शुभम आदमने, भारत चौधरी, सागर कुंभारे, तुषार सुरंकर, सचिन बावने व इतर उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)