तांत्रिक अडचणीची वेळीच दखल घ्या -चरण वाघमारे

By Admin | Updated: June 25, 2017 00:20 IST2017-06-25T00:20:15+5:302017-06-25T00:20:15+5:30

केंद्र तथा राज्य सरकारने गतीमान प्रशासन करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत.

Take note of technical difficulties - Charyan Waghmare | तांत्रिक अडचणीची वेळीच दखल घ्या -चरण वाघमारे

तांत्रिक अडचणीची वेळीच दखल घ्या -चरण वाघमारे

लोकमत न्यूज नेटवर्क
भंडारा : केंद्र तथा राज्य सरकारने गतीमान प्रशासन करण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. विविध विभागातील योजनेचा लाभ जनतेला पोहचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. त्यासाठी विविध योजनेचा लाभ लाभार्थ्यांना देताना तांत्रिक अडचणी येऊ देऊ नका, असे निर्देश आमदार चरण वाघमारे यांनी दिले आहे.
बँकेत होणारे लिंक फेल, आधार कार्ड, बँक खाते लिंकींग विहीत मुदतीत पूर्ण करणे आवश्यक आहे. त्याकरीता त्या त्या विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी योग्य दक्षता घेणे महत्वाचे आहे. त्यासाठी तांत्रिक साधन सामुग्री व तंत्रज्ञानाची जुळवाजुळव करून ठेवणे अगत्याचे आहे. याकरीता कर्मचाऱ्यांनी त्यांना आलेली तांत्रिक अडचणीचा तात्काळ निपटारा करणेसाठी मदत घेवून लाभार्थ्यास अडवून ठेवू नये, असे निर्देश आ. चरण वाघमारे यांनी तुमसर व मोहाडी तालुक्यातील शासकीय व निमशासकीय विभागाला दिले आहे.

Web Title: Take note of technical difficulties - Charyan Waghmare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.