प्रभाग आरक्षण सोडतीकडे नजरा

By Admin | Updated: June 30, 2016 00:36 IST2016-06-30T00:36:15+5:302016-06-30T00:36:15+5:30

नोव्हेंबर महिन्यात नगर परिषदेची निवडणूक येऊन ठेपली असून कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण निघणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Take a look at the ward reservation lease | प्रभाग आरक्षण सोडतीकडे नजरा

प्रभाग आरक्षण सोडतीकडे नजरा

नगर परिषद निवडणूक : २ जुलै रोजी होणार चित्र स्पष्ट
भंडारा : नोव्हेंबर महिन्यात नगर परिषदेची निवडणूक येऊन ठेपली असून कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण निघणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. २ जुलै रोजी होणाऱ्या आरक्षण सोडतीनंतर भंडारा, तुमसर, पवनी शहरातील चित्र स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीसाठी अनेक जण इच्छुक असून आरक्षण आणि प्रभाग रचनेनंतर वातावरण तापायला सुरूवात होणार आहे.
भंडारा नगर परिषदेत ३३ नगरसेवक राहणार आहे. यात १७ महिला आणि १६ पुरूष राहतील. ३२ वॉर्डाचे १६ प्रभाग राहतील. तुमसर नगर परिषदेत २३ नगरसेवक राहणार आहे. यात १२ महिला आणि ११ पुरूष राहतील. २२ वॉर्डाचे ११ प्रभाग राहतील. पवनी नगर परिषदेत १७ नगरसेवक राहणार आहे. यात ९ महिला आणि ८ पुरूष राहतील. १६ वॉर्डाचे ८ प्रभाग राहतील. प्रत्येक प्रभागात दोन जागांपैकी एक जागा महिला आरक्षित राहणार आहे. त्यामुळे प्रत्येक प्रभागामध्ये एक महिला व एक पुरुष दिसणार असून लोकसंख्येनुसार एका प्रभाग तीन उमेदवारांचा राहणार आहे.
प्रभागाच्या आरक्षणासह प्रभागाची निश्चिती २ जुलै रोजी सकाळी ११ वाजता त्या-त्या नगर परिषद कार्यालयात होणार आहे. ५ ते १४ जुलैपर्यंत हरकती व सूचना मांडता येणार आहे. त्यावर २७ जुलैपर्यंत जिल्हाधिकारी सुनावणी करतील. ही सुनावणीची कार्यवाही २ आॅगस्टपर्यंत विभागीय आयुक्तांकडे पाठविण्यात येणार आहे. १० आॅगस्टपर्यंत अंतिम होईल. १७ आॅगस्टला प्रसिद्ध करण्यात येणार आहे. त्यानंतरच प्रभागामध्ये निवडणूक तयारीला वेग येणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

नगराध्यक्षपद आरक्षणाकडे लक्ष
यावर्षी थेट नगराध्यक्ष निवडणूक होणार असून नगराध्यक्षांचे आरक्षण ही शासनस्तरावरची बाब असल्यामुळे ते केव्हा घोषित होते, याकडे राजकीय पदाधिकाऱ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत. नगराध्यक्ष पदासाठी सर्वच राजकीय पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर मोर्चेबांधणी सुरू आहे. परंतु आरक्षण निघाल्यानंतरच राजकीय समिकरण वेग घेतील.

वॉर्डात तोंडओळख कार्यक्रम सुरू
नगराध्यक्षपदाच्या शर्यतीत अनेकांनी फिल्डींग लावलेली आहे. मागीलवेळी आरक्षण निश्चित झाले तर नगराध्यक्षपदाची निवडणूक कुणी लढवायची याची आखणी सुरू केली होती. नगराध्यक्षपद डोळ्यापुढे ठेऊन इच्छुकांनी दोन महिन्यांपासून नगरपरिषद क्षेत्रात तोंड ओळख निर्माण करणे सुरू केले आहे. काही तर शुभेच्छांचे बॅनर लावून ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काहींना वॉर्ड आठवू लागले असल्यामुळे दररोज वॉर्डावॉर्डाचा फेरफटका मारणे सुरू आहे.

Web Title: Take a look at the ward reservation lease

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.