‘मुद्रा’चे कर्ज घ्या आणि उद्योजक बना!

By Admin | Updated: March 22, 2017 00:40 IST2017-03-22T00:40:45+5:302017-03-22T00:40:45+5:30

मुद्रा बँक योजनेच्या लाभासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी नजीकच्या राष्ट्रीयकृत बँकेशी किंवा ज्या बँकेमध्ये आपले खाते आहे, ....

Take a loan of 'currency' and become an entrepreneur! | ‘मुद्रा’चे कर्ज घ्या आणि उद्योजक बना!

‘मुद्रा’चे कर्ज घ्या आणि उद्योजक बना!

जिल्हाधिकारी : मुद्रा बँक योजनेच्या जनजागृती चित्ररथाचे उद्घाटन
भंडारा : मुद्रा बँक योजनेच्या लाभासाठी इच्छुक लाभार्थ्यांनी नजीकच्या राष्ट्रीयकृत बँकेशी किंवा ज्या बँकेमध्ये आपले खाते आहे, त्या बँकेशी संपर्क करुन प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेतून कर्ज घ्यावे आणि यशस्वी उद्योजक बनावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी केले.
मुद्रा बँक योजनेच्या प्रसार व प्रचारासाठी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या चित्रारथाला झेंडा दाखवून जिल्हाधिकारी डॉ.अभिजीत चौधरी यांनी मार्गस्थ केले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रदीपकुमार डांगे, निवासी उपजिल्हाधिकारी अशोक लटारे, जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते, जिल्हा सूचना विज्ञान अधिकारी संदीप लोखंडे, जिल्हा खनिकर्म अधिकारी नैताम व मिडीया सोल्युशनचे उमेश महतो उपस्थित होते.
यावेळी डॉ.चौधरी म्हणाले, ‘मुद्रा’ योजनेद्वारे व्यावसायिकांना विना जामिनार कर्ज उपलब्ध होणार आहे. कजार्साठी जामिन होणे आणि जामिनदार मिळवणं ही अतिशय अवघड गोष्ट आहे. मुद्रा बँक योजनेमुळे ही अवघड गोष्टच निकाली निघाली आहे. विना जामिनदार कर्ज योजनेमुळे व्यावसायिकांना फायदा होत असल्याचेही ते म्हणाले. प्रधानमंत्री मुद्रा योजनेत छोटया उद्योगासह कृषिपूरक व्यवसायासाठी कर्ज देण्याची सोय उपलब्ध आहे. शेतकरी व शेतीपूरक व्यवसाय करु इच्छिणाऱ्यांनी मुद्रा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
या चित्ररथाद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कौशल्य विकास केंद्र, महाविद्यालय, तहसिल, पंचायत समिती व निवडक गावांमधून मुद्रा बँक योजनेची प्रचार व प्रसिद्धी करण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा माहिती कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Take a loan of 'currency' and become an entrepreneur!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.