प्रकल्पग्रस्तांच्या पेन्शनसाठी पुढाकार घेणार
By Admin | Updated: January 20, 2015 22:33 IST2015-01-20T22:33:37+5:302015-01-20T22:33:37+5:30
गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त यातना सहन करीत आहेत. प्रकल्पग्रस्तांनी धरणासाठी जमीन, घरे दिल्यामुळे त्यांच्याजवळ आता काही शिल्लक नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना पाच हजार रूपये महिना

प्रकल्पग्रस्तांच्या पेन्शनसाठी पुढाकार घेणार
पवनी : गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त यातना सहन करीत आहेत. प्रकल्पग्रस्तांनी धरणासाठी जमीन, घरे दिल्यामुळे त्यांच्याजवळ आता काही शिल्लक नाही. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांना पाच हजार रूपये महिना पेन्शन देण्यात यावे, अशी मागणी सरकारकडे करणार आहे, असे प्रतिपादन आमदार रामचंद्र अवसरे यांनी केले.
चिचखेडा पुनर्वसनस्थळी आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी संघर्ष समितीचे संयोजक विलास भोंगाडे, लक्ष्मीकांत तागडे, चिचखेडाच्या सरपंच कुंदा तलमले, पाथरीच्या सरपंच रिना भुरे, उपसरपंच शंकर महाजन, दादा आगरे, माजी सभापती माणिक गेडाम, वामन सेलोकर, झिबल गणवीर, लक्ष्मण ईखार, दादा रामटेके, वामन कुंभारे, यादोराव मेश्राम उपस्थित होते.
यावेळी आ. अवसरे, विलास भोंगाडे, माणिक गेडाम, दादा आगरे यांचा प्रकल्पग्रस्तातर्फे शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी विलास भोंगाडे म्हणाले, समितीच्या आंदोलनामुळे प्रकल्पग्रस्तांना अनेक लाभ मिळाले. १२०० कोटी रूपयाचे पुनर्वसन पॅकेज मिळाले तरीही प्रकल्पग्रस्तांना आता उपजिवीकेचे साधन उरले नसल्यामुळे राज्य व केंद्र शासनाच्या योजनेचे उपजिवीकेच्या पॅकेजची गरज आहे. यावेळी उपस्थित अतिथीनीही समयोचित मार्गदर्शन केले.
प्रास्ताविक गुलाब मेश्राम, यांनी केले. संचालन कुनाल देशपांडे यांनी केले. कार्यक्रमासाठी चंद्र रामटेके, दीपक तलमले, प्रदीप बांगडे, सुनिता बगडे, लता बगडे, ज्योती चव्हाण, तुरसाबाई तलमले, राकेश मेश्राम, प्रकाश देशपांडे, प्रिती मेश्राम यांच्यासह प्रकल्पग्रस्तांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)