निवडणुका कागदी मतपत्रिकेवर घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:25 IST2021-07-15T04:25:04+5:302021-07-15T04:25:04+5:30
१९९९ पूर्वी भारत देशासह महाराष्ट्र राज्यात कागदी मतपत्रिका वापरून सर्व प्रकारच्या निवडणुकांचे आयोजन करण्यात येते होते; परंतु आधुनिक तंत्रज्ञान ...

निवडणुका कागदी मतपत्रिकेवर घ्या
१९९९ पूर्वी भारत देशासह महाराष्ट्र राज्यात कागदी मतपत्रिका वापरून सर्व प्रकारच्या निवडणुकांचे आयोजन करण्यात येते होते; परंतु आधुनिक तंत्रज्ञान विकसित झाले आणि १९९९ व २००१ च्या निवडणुकांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर ईव्हीएमचा वापर करण्यात आला. त्यानंतर प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीमध्ये ईव्हीएमचा वापर करण्यात येत आहे; परंतु ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड होत असल्याच्या घटना मतदान केंद्रावर घडत असल्यामुळे केंद्रावर उपस्थित असलेल्या कर्मचारी व मतदारांची तारांबळ उडत असते.
कोरोनाची विदारक परिस्थिती पाहता जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे ईव्हीएमद्वारे आयोजन केल्यास मतदान केंद्रावरील मतदारांचा मतदान करताना एखादा मतदार कोरोना आजाराने बाधित असल्यास त्या मतदार नागरिकाचा ईव्हीएमला स्पर्श झाल्यास यामुळे अनेकांना या जीवघेण्या रोगाची लागण, बाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
निवेदनावर जिल्हाध्यक्ष प्रकाश देशपांडे, मनोज मेश्राम, एस. के. वैद्य, बाळकृष्ण शेंडे, भागवत दामले, वामन कांबळे, माधव बोरकर, हरिदास बोरकर, अरुण ठवरे, नरेंद्र कांबळे, हर्षवर्धन हुमने, उमाकांत काणेकर, मच्छिंद्र टेंभुर्णे, संदीप बर्वे, विनाश खोब्रागडे, नितीश काणेकर, फाल्गुन वंजारी, रूपा मेश्राम, शांताराम खोब्रागडे, धनराज तिरपुडे, बंडू फुलझेले, विजय भोवते, कल्पना वानखेडे, शुभांगी भुतांगे, पपिता वंजारी, वर्षा शेंडे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.