शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
2
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
3
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
4
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
5
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
6
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
7
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
8
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
9
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
10
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
11
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
12
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
13
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
14
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
15
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
16
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
17
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
18
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
19
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
20
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा

पुरुषांनो सांभाळा ! महिलांपेक्षा पुरुषच अधिक कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 5:00 AM

जिल्ह्यात महिलांपेक्षा पुरुषच अधिक पाॅझिटिव्ह असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून दिसत आहे. ५७ हजार १७६ बाधितांपैकी तब्बल ३३ हजार २२२ पुरुष आणि २३ हजार ९५४ महिलांना कोरोनाची बाधा झाली. पुरुषांची टक्केवारी ५८.१० तर महिलांची टक्केवारी ४१.९० टक्के आहे. त्यामुळे पुरुषांनो, बाहेर जाताना सावधान ! स्वत:साठी नाही तर कुटुंबासाठी तरी सर्व नियमांचे पालन करा. भंडारा जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला. सध्या रुग्णसंख्या वेगाने घटत असली तरी धोका मात्र कायम आहे.

ठळक मुद्दे५८.१० टक्के पुरुष, तर ४१.९० टक्के महिलांना कोरोनाची बाधा

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी घरातील कर्त्या पुरुषावर असते. कोणतेही संकट असले तरी पुरुषाला बाहेर पडावेच लागते. कोरोनाच्या संकटातही चरितार्थासाठी कामधंद्याला गेल्याशिवाय भागत नाही. योग्य खबरदारी घेतली नाही की मग कोरोनाचा संसर्ग होतो. जिल्ह्यात महिलांपेक्षा पुरुषच अधिक पाॅझिटिव्ह असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीवरून दिसत आहे. ५७ हजार १७६ बाधितांपैकी तब्बल ३३ हजार २२२ पुरुष आणि २३ हजार ९५४ महिलांना कोरोनाची बाधा झाली. पुरुषांची टक्केवारी ५८.१० तर महिलांची टक्केवारी ४१.९० टक्के आहे. त्यामुळे पुरुषांनो, बाहेर जाताना सावधान ! स्वत:साठी नाही तर कुटुंबासाठी तरी सर्व नियमांचे पालन करा. भंडारा जिल्ह्यात एप्रिल महिन्यात कोरोनाचा उद्रेक झाला. सध्या रुग्णसंख्या वेगाने घटत असली तरी धोका मात्र कायम आहे. २७ एप्रिल २०२० रोजी जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबाधिताची नोंद झाली. तेव्हापासून रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र एप्रिल महिन्याने सर्वांना भयभीत करून टाकले होते. या महिन्यात सुमारे ३३ हजारांवर व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ५७ हजार १७६ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात पुरुषांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसत आहे. विविध कामांच्या निमित्ताने घराबाहेर पडावेच लागते. कामधंदा शोधताना कुठे ना कुठे संपर्क येतो आणि त्यातून मग कोरोनाचा संसर्ग होतो. यापेक्षाही दुसरे कारण म्हणजे अनेक जण बेफिकिरीने वागताना दिसून येतात. मास्क न घालणे, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन न करणे, आपल्याला कोरोना होऊच शकत नाही, असा अतिआत्मविश्वास अनेक पुरुषांमध्ये दिसून येतो. याउलट महिला सर्व नियमांचे पालन करतात. अगदी महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडतात. मास्क, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करतात. फाजिल आत्मविश्वास बाळगत नाहीत. त्यामुळे महिलांमध्ये भंडारा जिल्ह्यात तरी कोरोनाचे प्रमाण कमी दिसून येत आहे. वयोगटानुसार विचार केल्यास २१ ते ३० आणि ३१ ते ४० या वयोगटातच सर्वाधिक पुरुष कोरोनाबाधित असल्याचे दिसून येते. २१ ते ३० वयोगटात ६,६१३ आणि ३१ ते ४० वयोगटात ७,३४३ पुरुष पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. घरच्या कर्त्या पुरुषाला कोरोना झाल्यास कुटुंबाचे काय होते याची उदाहरणे आसपास दिसत आहेत. कोरोना उपचारासाठी झालेला अवाढव्य खर्च कुटुंबाला दहा वर्षे मागे घेऊन जातो. दुर्दैवाने कर्ता पुरुष गमावला तर संपूर्ण कुटुंब उघड्यावर येण्याची भीती असते. गत आठ-दहा दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या घटली आहे. मृतांचे प्रमाणही कमी आहे. त्यामुळे पुन्हा अनेक जण बिनधास्तपणे फिरताना दिसत आहेत. कोरोना संपला नाही त्यामुळे खबरदारी घेणे गरजेचे आहे. खासकरून पुरुषांनी आणि त्यातही तरुणांनी कोरोनाला सहज घेऊ नये.

भंडारा तालुक्यात आज एकही मृत्यू नाही- जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यूची नोंद भंडारा तालुक्यात झाली आहे. दररोज मृत्यूची नोंद तालुक्यात होत होती. गेल्या कित्येक दिवसांपासून दररोज मृतांचा आकडा वाढत होता. मात्र, रविवार दिलासा देणारा ठरला. तालुक्यात रविवारी कुणाचाही कोरोनाने मृत्यू झाला नाही. जिल्ह्यात आतापर्यंत १०२० व्यक्तिंचा कोरोनाने बळी घेतला. त्यात भंडारा ४७९, मोहाडी ९२, तुमसर १११, पवनी १००, लाखनी ९०, साकोली १००, लाखांदूर ४८ व्यक्तिंचा समावेश आहे. 

९६ व्यक्ती पाॅझिटिव्ह- जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असून, बरे होण्याचे प्रमाण वेगाने वाढत आहे. रविवारी जिल्ह्यात ९६ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्या, तर ५१६ व्यक्तींनी कोरोनावर मात केली. चौघांचा मृत्यू झाला असून, आतापर्यंत ५३ हजार २६१ व्यक्ती कोरोनामुक्त झाल्या आहेत. रविवारी २०३२ व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात भंडारा तालुक्यात ४०, मोहाडी २, तुमसर ९, पवनी १२, लाखनी ५, साकोली २५ आणि लाखांदूर तालुक्यात ३ अशा ९६ व्यक्ती पाॅझिटिव्ह आढळून आल्या आहेत. जिल्ह्यात चौघांचा मृत्यू झाला असून, त्यात तुमसर, साकोली तालुक्यातील प्रत्येकी १, तर लाखनी तालुक्यातील दोघांचा मृत्यू झाला. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या