शहरं
Join us  
Trending Stories
1
विनाशाची ढगफुटी! पृथ्वी कोपली तर केलेल्या चुकांची माफी मागण्याची संधीदेखील देणार नाही
2
थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला...
3
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
4
काटली जवळ हिट अँड रन, मॉर्निंग वॉकला गेलेले तीन युवक ठार; मालवाहू ट्रक बनला काळ!
5
घरात शिरला, दरवाजा लावला, मित्राच्या पत्नीला संपवलं अन्...; तरुणाच्या कृत्याने परिसर हादरला!
6
Donald Trump US Tariffs: लेदरपासून ज्वेलरीपर्यंत… डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा कुठे-किती होणार परिणाम? पाहा संपूर्ण यादी
7
रशियाशी व्यापार केल्याबद्दल फक्त भारतालाच का लक्ष्य केले? ट्रम्प म्हणाले, 'आता फक्त ८ तास...'
8
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
9
Raksha Bandhan 2025:रक्षाबंधनाला 'या' पाच गोष्टी औक्षण थाळीत असायलाच पाहिजेत!
10
तिसरा श्रावण शुक्रवार: शुभ-पुण्य मिळेलच, लक्ष्मी देवी वरदान देईल; ‘असे’ करा वरदलक्ष्मी व्रत
11
पक्के घर देण्याचा वादा तीन वर्षांनंतरही पूर्ण हाेईना; महाराष्ट्रात ‘पीएम आवास’ ची २७ लाख घरे अद्याप अपूर्ण
12
बुमराहच्या अनुपस्थितीत भारताने मिळवलेला विजय योगायोगच! हा गोलंदाज ‘असामान्य आणि अविश्वसनीय’ प्रतिभेचा धनी - सचिन तेंडुलकर 
13
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
14
पाकिस्तान-अमेरिकेत नक्की काय सुरू? आधी तेलाचा करार, मग टॅरिफही कमी केला; आता असिम मुनीर USच्या वाटेवर!
15
मतदार यादीतील ६५ लाख नावे का वगळली हे सांगा, बिहारवरून सुप्रीम कोर्टाचे  आयोगाला आदेश
16
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
17
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
18
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
19
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
20
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब

‘पीओपी’ मूर्ती विक्रेत्यांवर कारवाई करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 00:10 IST

ग्रामीण भागात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती विकणाºयावर दंडात्मक कारवाई करुन कायमस्वरुपी बंदी घालण्याचा ठराव भंडारा नगरपरिषदेने यापूर्वीच ३१ डिसेंबर २०१८ ला घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हाभर जिल्हा प्रशासनाने बंदीचे निर्देश दिले.

ठळक मुद्देमूर्तिकारांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली

लोकमत न्यूज नेटवर्कचिचाळ : जिल्हा प्रशासनाने कुंभार महासंघाच्या निवेदनाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याने जिल्हा प्रशासनाने शहरासह व ग्रामीण भागात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या (पीओपी) मूर्ती विकणाºयावर दंडात्मक कारवाई करुन कायमस्वरुपी बंदी घालण्याचा ठराव भंडारा नगरपरिषदेने यापूर्वीच ३१ डिसेंबर २०१८ ला घेतला होता. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिल्हाभर जिल्हा प्रशासनाने बंदीचे निर्देश दिले. त्याचा सकारात्मक परिणामाने पवनी तालुक्यात पीओपी मूर्तींवरील बंदीने बºयाच मूर्तिकारांनी पीओपीच्या मूर्ती तयार केल्या नाहीत.मात्र पवनी तालुक्यात काही ठिकाणी आजही अड्याळ, कोंढा, पवनी, आसगाव, बाचेवाडी आदी गावात जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून पीओपीच्या मूर्ती तयार केल्या जात आहेत. परंतु जे मूर्तीकार शासनाच्या आदेशाचे पालन करत आहेत त्यांच्यावर आज उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे पीओपी मूर्तीकारांवर जिल्हा प्रशासनाने कडक कारवाई करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तहसीलदार पवनी यांचे मार्फत निवेदन देऊन कारवाई करण्याची मागणी कुंभार समाज व मातीमूतीकारांनी केली आहे.निवेदनात पवनी तालुक्यात कुंभार समाज व मातीचे मूर्तीकामगार प्रत्येक खेड्यापाड्यात वास्तव्यास आहेत. मातीच्या मूर्ती तयार करून कुटुंबाचा उदरर्निाह करतात. मात्र तालुक्यातील व जिल्ह्यातील गर्भश्रीमंत मूर्तीकारांची पर जिल्ह्यातून पीओपीच्या कच्चा माल आणून पैसे कमावू धंदा अवलंबिल्याने माती मूर्तीकारांवर उपासमारीची पाळी आली आहे.गत काही वर्षापासून भंडारा जिल्ह्यात पीओपीच्या मूर्ती विकल्या जात आहेत. अत्ळंत आकर्षक रंगात आणि कमी किमतीत विकत असल्यामुळे देवदेवतांच्या मूर्ती भाविक खरेदी करतात. मात्र त्या मूर्तीचे विसर्जन नदीपात्रात अथवा गाव तलावामध्ये केले जातात. पण त्या मूर्ती पूर्णत: विसर्जीत होत नाही. नदीपात्रातील व तलावातील पाणी कमी झाल्यानंतर पीओपीच्या मूर्ती जसेच्या तशेच दिसतात. त्यामुळे मूर्तींची विटंबना व पर्यावरण प्रश्न निर्माण होतो. परंतु परंपरागत मातीच्या मूर्ती बनविणाºया कुंभार समाजावर व माती मूर्तीकलाकारावर उपासमारीची पाळी आली असल्याने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.पवनी तालुक्यात पवनी, अड्याळ, कोंढा, बाचेवाडी आदी गावात पीओपी मूर्तिकारांनी दुकानदाºया थाटल्या आहेत. जिल्हाधिकारी व भंडारा नगरपरिषदेने प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीवर बंदी व दंडाची कारवाई करण्याचे निर्देश आठ महिन्याअगोदर देण्यात आले.मूर्तिकारांनी पीओपीच्या मूर्ती तयार केल्या नाही. मात्र तालुक्यातील कोंढा, पवनी, अड्याळ, बाचेवाडी आदी गावातील मूर्तीकारांनी त्या जिल्हा प्रशासनाच्या आदेशाला न जुमानता पीओपीच्या मूर्ती तयार केल्या आहेत. मात्र ज्यांनी शासनाच्या आदेशाचे पालन केले त्यांचेवर अन्याय झाला असून उपासमारीची पाळी आली आहे.पवनी तालुक्यातील पीओपी मूर्र्तिकारांना भेट दिली असता त्यांना शाडू मातीचे मूर्ती असल्याचे सांगून पीओपी विक्रीचा गोरखधंदा केला जात आहे. करिता जिल्हा प्रशासनाने तात्काळ त्या विक्रेत्यांची चौकशी करून दंड व बंदीची कारवाई करण्याची मागणी दुर्गेश हटवार, रवींद्र लेदे, मधू जांभुळकर, प्रकाश हातेल, महादेव मोहरकर, पांडूरंग मोहरकर, गणेश वाघमारे, पांडूरंग मेश्राम, राकेश वरवाडे, विमल वरवाडे, अशोक वरवाडे, सूर्यभान वरवाडे, वसंत वरवाडे, वंदना खांदाडे, प्रतिमा वरवाडे, प्रदीप वरवाडे, माधव मेश्राम, गोविंदा आठवले यांनी निवेदनातून केली आहे.

टॅग्स :Socialसामाजिक