भ्रष्टाचारप्रकरणी कारवाई करा, अन्यथा आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:39 IST2021-09-06T04:39:05+5:302021-09-06T04:39:05+5:30

मोहरणा येथील विविध सेवा सहकारी संस्था अंतर्गत २०१९-२० या वर्षात विविध कामात आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा ठपका तत्कालीन लेखा परीक्षकांनी ...

Take action on corruption, otherwise agitation | भ्रष्टाचारप्रकरणी कारवाई करा, अन्यथा आंदोलन

भ्रष्टाचारप्रकरणी कारवाई करा, अन्यथा आंदोलन

मोहरणा येथील विविध सेवा सहकारी संस्था अंतर्गत २०१९-२० या वर्षात विविध कामात आर्थिक भ्रष्टाचार झाल्याचा ठपका तत्कालीन लेखा परीक्षकांनी लेखा परीक्षण अहवालात केला आहे. या संस्थेत कार्यरत गट सचिवाने जिल्हा उपनिबंधकांच्या निर्देशाचे उल्लंघन करून नियमबाह्य व बेकायदेशीररित्या मानधनात वाढ करून उचल केल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.

इमारत फंड घेण्याचे कोणतेही शासन निर्देश नसताना नियमबाह्यरित्या कर्जदार शेतकऱ्यांकडून इमारत फंडाच्या नावाखाली अवैध वसुली करून वसूल रकमेची अफरातफर केल्याचा ठपका लेखापरीक्षण अहवालात ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, यासबंधी भ्रष्टाचार प्रकरणी लेखा परीक्षण अहवालानुसार ग्रामस्थांनी सहायक निबंधकांना तक्रार करून कारवाइची मागणी करताच संस्थेच्या गट सचिवाने सारवासारव करतांना शासन प्रशासनासह गावकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचे बोलल्या जात आहे. २०१९-२० मध्ये संस्थेंतर्गत झालेल्या कथित भ्रष्टाचाराची तक्रार गत ३० ऑगष्ट रोजी गावकऱ्यांनी करून कारवाईची मागणी केली आहे. मात्र मागणीनुसार कारवाईपासून बचावासाठी या संस्थेच्या सचिवाने तब्बल १० वर्षांपूर्वी या संस्थेंतर्गत झालेला भ्रष्टाचार पुढे करून शासन प्रशासनाची दिशाभूल चालविल्याची चर्चा केली जात आहे.

Web Title: Take action on corruption, otherwise agitation