‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई करा
By Admin | Updated: September 1, 2015 00:30 IST2015-09-01T00:30:59+5:302015-09-01T00:30:59+5:30
तालुक्यातील मुरमाडी (सावरी) येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची निवडणूक आयोजित करण्यात आली असल्याचे ..

‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई करा
मुरमाडी सावरी येथील प्रकार : प्रकरण उपसरपंचपदाच्या निवडणुकीचे
लाखनी : तालुक्यातील मुरमाडी (सावरी) येथील ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाची निवडणूक आयोजित करण्यात आली असल्याचे खंडविकास अधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात स्पष्ट करुन कोणतेही कारण नसतांनी निवडणूक रद्द केल्याचा आरोप ग्रामपंचायत सदस्यांनी केला आहे.
लाखनी तालुक्यातील मुरमाडी (सावरी) ग्रामपंचायतद्वारे १८ आॅगस्ट रोजी मासिक सभेची सूचना काढून त्यात उपसरपंचपदाची निवडणूक घेण्याबाबतचा विषय ठेवण्यात आला होता. परंतु निवडणुकीची प्रक्रिया नियमानुसार घेण्यासंबंधात चर्चा करण्याच्या ऐवजी निवडणुक पार पडणार असल्याचे समजुन ग्रामपंचायत सदस्यांनी निवडणुकीची मागणी केली होती.
ग्रामसभेचे अध्यक्ष सरपंच राजेश खराबे, विकास अधिकारी जे. डब्ल्यू. राऊत, ग्रामविकास अधिकारी यु. के. पाढे यांनी हेतुपुरस्पर उपसरपंचपदाची निवडणूक घेतली. नसल्याची तक्रार खंडविकास अधिकारी हेमंत मेहर यांच्याकडे केली आहे.
सभेला ग्रामपंचायत सदस्य निलेश गाढवे, मनोज ईश्वरकर, अश्विनी चोले, प्रतिभा साखरे, शालू बोपचे, शेषराव वंजारी, गायत्री बोरकर, दुर्गा उईके, शालु चवळे, हरिभाऊ पडोळे, विकास वासनिक उपस्थित होते.
सदस्यांमध्ये दोन गट तयार झाले. त्यात एका गटाने निवडणुकीची मागणी केली तर दुसऱ्या गटाने निवडणुक नियमानुसार घेण्याची मागणी केली. सदर निवडणुक कार्यक्रम पत्रिकेनुसार नोटीस न काढल्यामुळे निवडणुक रद्द करण्यात आली होती. (तालुका प्रतिनिधी)