‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई करा
By Admin | Updated: January 17, 2015 22:54 IST2015-01-17T22:54:05+5:302015-01-17T22:54:05+5:30
वारंवार भ्रष्टाचाराचे तसेच रुग्णांची हेळसांड करणारे बारव्हाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मालडोंगरे यांचेवर तात्काळ बडतर्फची कार्यवाही करावी. या मागणी करीत तालुका मार्क्सवादी कम्युनिस्ट

‘त्या’ अधिकाऱ्यावर कारवाई करा
लाखांदूर : वारंवार भ्रष्टाचाराचे तसेच रुग्णांची हेळसांड करणारे बारव्हाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मालडोंगरे यांचेवर तात्काळ बडतर्फची कार्यवाही करावी. या मागणी करीत तालुका मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र बारव्हा यापूर्वीही बालमृत्यूच्या एकूण टक्केवारीत जिल्ह्यात अग्रेसर असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांवर आरोप होत होते. तर वेळेवर उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना उपचार न करता अरेरावीची भाषा यामुळे सर्वसामान्य नागरिक व रुग्णांच्या नातेवाईकांनी अनेकदा राडा केला. मात्र, चिचाळ येथील भूपेश मेश्राम यांच्या पत्नीच्या प्रसूतीदरम्यान असाच प्रकार पुन्हा झाल्याने वैद्यकीय अधिकाऱ्याविरूद्ध रोष व्यक्त केला जात आहे.
यापूर्वी कोच्छी येथील एका महिलेच्या प्रसूतीदरम्यान रुग्णवाहिकेची मागणी केली असता वादक गैरहजर असल्याचे कारण सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्ष गावकऱ्यांनी रुग्णालयाला भेट दिली असता वाहक मद्यधुंद अवस्थेत दिसला. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नैतामे यांनी पोलिसांच्या सहकार्याने वैद्यकीय तपासणी वाहकाची झाली होती. परंतु या प्रकरणाला बगल देत वाहकाची बाजू बरोबर ठेवून गैरव्यवहाराला बळ देण्यात आले होते.
वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या गैरवर्तनामुळे यापूर्वी कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारले असता तत्कालीन आमदार नाना पटोले यांनी भेट देऊन वैद्यकीय अधिकाऱ्याला समजसुद्धा दिली होती. मात्र यात सदर वैद्यकीय अधिकाऱ्याने स्वत:मध्ये सुधारणा न करता पुन्हा एकदा रुग्णांच्या नातेवाईकांचा रोष आपल्यावर ओढवून घेतला. चिचाळ येथील भाकप सचिन भूपेंद्र मेश्राम, निशिकांत मेश्राम यांनी पंचायत समितीपुढे आमरण उपोषण सुरू करून प्रसूतीकरिता रुग्णवाहिका न देणे, रुग्णांची काळजी न घेणे, मानव विकासच्या जी. आर. ची अवहेलना करणे रात्र पाळीला एकही कर्मचारी उपस्थित न राहणे, वैद्यकीय अधिकाऱ्याच्या हलगर्जीमुळे बालमृत्यूचे प्रमाण वाढल्याने विभागीय चौकशी करून तत्काळ बडतर्फ करण्याची मागणी उपोषणातून करण्यात आली. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नैतामे यांनी उपोषण मंडपाला भेट देऊन मागण्या समजून घेतल्या. तालुका शिवसेना अध्यक्ष गजानन दोनाडकर, गायकवाड यांनी उपोषण मंडपाला भेट दिली. (तालुका प्रतिनिधी)