आंबेडकर भवन पाडणाऱ्यांवर कारवाई करा
By Admin | Updated: July 7, 2016 00:33 IST2016-07-07T00:33:08+5:302016-07-07T00:33:08+5:30
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई (दादर) येथे स्थापन केलेले आंबेडकर भवन काही व्यक्तींनी पाडले. यामुळे सर्वत्र असंतोष पसरला असून ऐतिहासीक भवन

आंबेडकर भवन पाडणाऱ्यांवर कारवाई करा
तहसीलदार यांना निवेदन : राष्ट्रवादी मागासवर्गीय सेलची मागणी
तुमसर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुंबई (दादर) येथे स्थापन केलेले आंबेडकर भवन काही व्यक्तींनी पाडले. यामुळे सर्वत्र असंतोष पसरला असून ऐतिहासीक भवन जमिनदोस्त करणाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी मागासवर्गीय सेलच्या वतीने करण्यात आली आहे. याचे निवेदन तहसीलदार यांच्या मार्फतीने मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले आहे.
दादर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्यासाठी आंबेडकर भवनाची निर्मिती केली होती. या भवनाशी आंबेडकरी अनुयायांचे भावनीक नाते जुडले आहे. आंबेडकरी समाजासाठी ते भवन एक आदर्श भवन होते. सदर ऐतिहासीक वास्तू मध्यरात्रीच्या सुमारास अनधीकृतरित्या जमीनदोस्त करण्यात आले.
या भवनात बुद्ध भूषण प्रिटींग प्रेस होती. यामुळे आंबेडकरी जनतेच्या भावना दुखावल्या आहेत. या जखमेचा राष्ट्रवादी मागासवर्गीय सेल व सामाजिक न्याय विभागाच्या वतीने निषेध करण्यात आला. याप्रकरणात दोषींवर कारवाई करावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देण्यात आले. यावेळी अरुण गजभिये, तिलक गजभिये, ओम करमकर, संकेत गजभिये, अंकुर ठाकूर, सरोज पाटील, निशिकांत पेठे, अनिल गजभिये, मयुर चवरे, मॉरिस भवसागर, विशाल गजभिये, दीपक प्रधान आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)