लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारला घेतलेल्या आढावा बैठकीत नागरिकांच्या विविध ३२ समस्या निकाली काढून राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांना न्याय दिला आहे.यावेळी जिल्हाधिकारी सुहास दिवसे, मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सुर्यवंशी, जिल्हा पोलीस अधिक्षक विनीता साहू, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी काशिनाथ तरकसे, महावितरणचे अधिक्षक अभियंता सुरेश मडावी, निवासी उपजिल्हाधिकारी विजय भाकरे, उपजिल्हाधिकारी सुजाता गंधे, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा मंजुषा ठवकर, अधिक्षक उत्पादन शुल्क ज्ञानेश्वरी आहेर, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश गायकवाड उपस्थित होते.ग्रामपंचायत परिचर पदभरती चौकशी, विविध आवास योजनांची अंमलबजावणी, कामबंद आंदोलन, समाजशास्त्र तज्ज्ञ या पदावर नियुक्ती, रमाई आवास योजना, अनुसूचित जाती पट्टे मिळणे, वन जमीनीवरील अतिक्रमण, दिव्यांग व्यक्ती प्लाट, लघु कालव्यात गेलेल्या जमीनीचा मोबदला मिळणे, रुग्णवाहिका चालकांना न्याय मिळवून देणे, पिण्याचे पाणी व सिंचनासाठी सोय, व्याघ्र प्रकल्प बांधित शेतकऱ्यांना शेत जमीन मोबदला, जिल्हा क्षयरोग केंद्र येथे क्ष-किरण यंत्र पुरविणे, समाज मंदिर बांधकाम, मानसेवी होमगार्ड समादेशक रिक्त पद भरणे यासह अनेक समस्या नागरिकांनी या बैठकीत पालकमंत्र्याकडे लेखी स्वरुपात दाखल केल्या होत्या. या समस्यांचा निपटारा त्यांनी केला.जिल्हा क्षयरोग केंद्रात विशेष बाब म्हणून क्ष-किरण यंत्र पुरविण्याची मागणी यावेळी करण्यात आली असता खनिकर्म विकास निधीतून तात्काळ १५ लाख रुपये मंजूर करुन विशेष बाब म्हणून क्ष-किरण यंत्र खरेदी करण्याचे निर्देश ना.चंद्रशेखर बावनकुळे यांनी आरोग्य विभागाला दिले. बावनथडी प्रकल्पाचे पाणी धर्मापुरी मायनरला मिळत नसल्याबाबत तक्रार आली असता शनिवारपर्यंत कॅनलचे पूर्ण काम करण्याबाबतचे निर्देश दिले.पुढील आठवडयात या ठिकाणी आपण प्रत्यक्ष पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. भंडारा तालुक्यातील धारगाव क्षेत्रातील शेती सिंचनासाठी विशेष योजना तयार करण्याबाबतच्या सूचना पालकमंत्र्यांनी संबंधित विभागाला दिल्या आहेत.भंडारा जिल्ह्याातील शेतकºयांना दिवसा ९ ते ५ यावेळेत कृषिपंपासाठी वीज देण्याबाबत तातडीने निर्णय घेण्यात येणार असून यासंबंधीचा अहवाल वीज विभागाने पाठविण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या. पवनी-करांडला व्याघ्र प्रकल्प बाधित शेतकºयांच्या उर्वरित शेतजमीनीचा मोबदला देण्याबाबतचा प्रस्ताव एक महिन्याच्या आत वन विभागाने पाठवावा, असे निर्देशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले.
पालकमंत्र्यांकडून एकाच बैठकीत ३२ समस्या निकाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2018 22:15 IST
जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारला घेतलेल्या आढावा बैठकीत नागरिकांच्या विविध ३२ समस्या निकाली काढून राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांना न्याय दिला आहे.
पालकमंत्र्यांकडून एकाच बैठकीत ३२ समस्या निकाली
ठळक मुद्देचंद्रशेखर बावनकुळे : कृषीपंपासाठी वीज देण्याचा तातडीने निर्णय घेणार