शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
3
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
4
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
5
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
6
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
7
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
8
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
9
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
10
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
11
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
12
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
13
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
14
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
15
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
16
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
17
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
18
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
19
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?

ताई, रडायचं नाही, लढायचंय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2019 01:15 IST

नानांचे पाय सिरसोली ग्रामपंचायतच्या उंबरठ्यावर पडताच शिवलाल लिल्हारेच्या पत्नीने डोळ्यातून अश्रू ढाकले. हुंदके देत विस्कटलेल्या संसाराची वेदनादायी अवस्था कथन केली. यावेळी, नानांनी धीर देत, ताई तू रडायच नाही, आता लढायचं आहे, हा नाना पटोले तुमच्या पाठीशी आहे, अशी हिंमत देऊन तिची सांत्वना केली.

ठळक मुद्देनाना पटोले : शिवलालच्या पत्नीला दिला धीर

लोकमत न्यूज नेटवर्कमोहाडी : नानांचे पाय सिरसोली ग्रामपंचायतच्या उंबरठ्यावर पडताच शिवलाल लिल्हारेच्या पत्नीने डोळ्यातून अश्रू ढाकले. हुंदके देत विस्कटलेल्या संसाराची वेदनादायी अवस्था कथन केली. यावेळी, नानांनी धीर देत, ताई तू रडायच नाही, आता लढायचं आहे, हा नाना पटोले तुमच्या पाठीशी आहे, अशी हिंमत देऊन तिची सांत्वना केली.सिरसोलीच्या शिवलाल लिल्हारे यांचे उभ घरं पाडण्यात आले होते. शिवलालचा घर उध्वस्त केला. त्याच जागेवर प्रशासनाने घराचा पट्टा द्यावा या व इतर मागण्यांसाठी मोहाडी तहसिल कार्यालयावर जनाक्रोश मोर्चा काँग्रेसचे राष्ट्रीय नेते नाना पटोले यांच्या नेतृत्वात काढण्यात आला होता. मोर्चा समापन झाल्यावर नाना पटोले यांनी सिरसोली गावाला भेट दिली.शिवलालचे पडलेलं घर बघितले. कोणत्या कारणामुळे घर पाडले याची माहिती घेतली. घर पाडायची परिस्थिती नसताना घर पाडल्याची व शिवलालचे कुटुंब उघड्यावर आणल्याची प्रतिक्रिया लोकमतजवळ नाना पटोले यांनी व्यक्त केली. गावातील एका व्यक्तीनी तीन वर्षापासून कृषी पंपाला वीज जोडणी न मिळाल्याचे सांगितले. एका अपंग व्यक्तीचे शासनाकडून मिळणारा लाभ बंद करण्याची माहिती दिली, अशा बऱ्याच समस्या सिरसोली वासीयांनी कथन केल्या. शिवलालचे घर पाडल्यानंतर त्यांचे कुटुंब असुविधायुक्त ग्रामपंचायतच्या इमारतीत आश्रयीत झाली आहे. शिवलाल लिल्हारेची पत्नी सुनंदा एकटीच ग्रामपंचायतमध्ये बसली होती. नाना पटोले यांचे पाय ग्रामपंचायतच्या पायरीवर पडताच तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. पदराने अश्रू पुसत तिचे हुंदके काळीज हेलावणारे होते. नानाची जमिनीवरच बसून आधी, ताई, तू आता रडू नकोस, तूला लढायच आहे. हा नाना तुझ्या व संपूर्ण परिवाराच्या पाठीशी आहे, असे बोलले. एक क्षण स्तब्धता होवून धीर गंभीर वातावरण निर्माण झालं होत.आम्हाला खायला अन्न नाही, घालायला कपडे नाही, कुणीतरी आम्हाला डबा आणून देतो, हातचे जेवण माझ्या मुलांनी खाल्ले नाही, ते तिडके उपोषणावर बसली आहे, असे काळीजाला भिडणारे शब्द ऐकून नानांच मन पार हादरून गेल होत. नानांनी सुनंदा लिल्हारेंना धीर ठेवायच, हिंमतीने लढायच, मी तुमच्या पाठीशी असेन असे सांगून ग्रामपंचायतच्या दालनातून निघाले. यावेळी किसान नेते माधवराव बांते, राष्ट्रवादीचे नेते राजू कारेमोरे, काँग्रेसचे डॉ. पंकज कारेमोरे, किरण अतकरी, कमलाकर, निखाडे, डॉ. सुनील चवळे, नरेश ईश्वरकर, रमेश पारधी, आदी उपस्थित होते. गावातील जनतेची मोठ्या प्रमाणात नानांना बघण्यासाठी गर्दी जमी होती. मोठ्या प्रमाणावर पोलीस ताफाही होता.उदारवाद व सहकार्यउदारवादी व सहकार्य करण्याचा नाना पटोले यांचा स्वभाव सिरसोली येथेही दिसून आला. सुनंदा लिल्हारे यांना सिरसोली येथे व मोहाडी मधील उपोषण मंडपात शिवलाल लिल्हारे यांना आर्थिक मदत केली. उपोषण मंडळपात नाना पटोले यांनी शिवलालची भेट घेतली. रडून रडून शिवलालचे डोळे लालबंूद झाले होते. नानांनी रडणाऱ्या शिवलालचे अश्रू आपल्या दुपट्याने पूसून त्याला धीर दिला.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले