सुबोध विद्यालयात तंबाखूजन्य पदार्थांची प्रतीकात्मक होळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:36 IST2021-04-02T04:36:41+5:302021-04-02T04:36:41+5:30
मासळ : सुबोध विद्यालय तथा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात शालेय परिसरातील प्लॅस्टिक व प्लॅस्टिकजन्य टाकाऊ वस्तू,कचरा तसेच गुटखा, तंबाखू, ...

सुबोध विद्यालयात तंबाखूजन्य पदार्थांची प्रतीकात्मक होळी
मासळ : सुबोध विद्यालय तथा विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयात शालेय परिसरातील प्लॅस्टिक व प्लॅस्टिकजन्य टाकाऊ वस्तू,कचरा तसेच गुटखा, तंबाखू, सिगारेट आदींचे वेस्टन व कचऱ्याची होळी करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी शालेय आवारातील कचरा,प्लॅस्टिक, तसेच प्लॅस्टिकजन्य वस्तू, गुटखा, तंबाखू, सिगारेट आदींचे वेस्टन(कव्हर) गोळा केले. प्रभारी मुख्याध्यापक वाय.के. घोनमोडे यांनी याप्रसंगी पर्यावरणपूरक होळीचे महत्त्व उपस्थित विद्यार्थ्यांना सांगितले. तंबाखू ,प्लॅस्टिक व तत्सम पदार्थ यापासून प्रत्येक माणसाने दूर रहावे. ह्या बाबी माणसाला तसेच पृथ्वीवरील प्रत्येक घटकास घातक आहेत. सन, उत्सव साजरे करताना पर्यावरणाचा विचार केला पाहिजे, असेही त्यांनी आपले विचार मांडले. यावेळी विद्यालयातील एस.जी. हुकरे, एन.एच. भुरे,आर.के. घोनमोडे, सी.व्ही. लंजे, जी.एस. चारमोडे, एस.बी. उरकुडे, व्ही.एल. कुथे व विद्यार्थी आदी उपस्थित होते. कोविड-१९ चे मार्गदर्शक सूचनांचे पालन करत कार्यक्रम पार पाडण्यात आला. कार्यक्रमासाठी आर.के. घोनमोडे, जी.एस. चारमोडे यांनी सहकार्य केले.