ग्रामीण भागात 'स्वाईन फ्लूू' जनजागृती
By Admin | Updated: February 22, 2015 00:32 IST2015-02-22T00:32:30+5:302015-02-22T00:32:30+5:30
सध्या संसर्गजन्य 'स्वाईन फ्ल्यू'ने सर्वत्र धूमाकूळ घातला आहे. आतापर्यंत नागपुरातील विविध रुग्णालयात २४ नागरिकांचे बळी गेले.

ग्रामीण भागात 'स्वाईन फ्लूू' जनजागृती
साकोली : सध्या संसर्गजन्य 'स्वाईन फ्ल्यू'ने सर्वत्र धूमाकूळ घातला आहे. आतापर्यंत नागपुरातील विविध रुग्णालयात २४ नागरिकांचे बळी गेले. सध्याचे वातावरण हे स्वाईन फ्ल्यूचा प्रसार आणि प्रचार होण्यास सहाय्यभूत ठरत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये स्वाईन फ्ल्यू बाबत जागृती व्हावी. यासाठी तालुक्यातील प्रत्येक गावात तालुका आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती मोहिम सुरू आहे. यासंदर्भात नुकतीच पंचायत समितीच्या तालुका आरोग्य विभागाच्या वतीने कार्यालय परिसरात कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
स्वाईन फ्लूमुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची व बांधीत रुग्णांची संख्या वाढत असल्याने आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी आरोग्य विभागातर्फे विशेष उपक्रम राबवित आहे. या मोहिमेत सहभागी होवून बाजीराव करंजेकर फार्मसी महाविद्यालयाने स्वाईन फ्लू जनजागृती व्हावी यासाठी रॅली काढली. यात डी फार्मच्या भाग एक व दोन वर्गाच्या १०० विद्यार्थी-विद्यार्थीनींचा सहभाग होता. सदर कार्यशाळेत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. जे. डब्ल्यू. सुखदेवे यांनी कार्यशाळेत स्वाईन फ्ल्यू व कुष्ठरोग या आजाराबाबत मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून बाजीरावजी करंजेकर फार्मसी महाविद्यालयाचे प्राध्यापक वृंद अनिल साव,
दीपक वासनिक, विशाल परशुरामकर, तृप्ती वासनिक, मंजूषा रंगारी उपस्थित होत्या. (तालुका प्रतिनिधी)