जलतरणपटूंनो, जिल्ह्याचा नावलौकिक करा

By Admin | Updated: January 12, 2016 00:41 IST2016-01-12T00:41:47+5:302016-01-12T00:41:47+5:30

आरोग्याच्या दृष्टीने पोहण्याचा व्यायाम अत्यावश्यक मानला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर जलतरण स्पर्धा होत असतात.

Swimmers, make the district famous | जलतरणपटूंनो, जिल्ह्याचा नावलौकिक करा

जलतरणपटूंनो, जिल्ह्याचा नावलौकिक करा

खासदार चषक : नाना पटोले यांचे प्रतिपादन, विविध गटात नाकाडे, मेश्राम, मदनकर, पशिने, शक्तीकर, पांडे अव्वल
भंडारा : आरोग्याच्या दृष्टीने पोहण्याचा व्यायाम अत्यावश्यक मानला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावर जलतरण स्पर्धा होत असतात. मात्र या स्पर्धांमध्ये भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील स्पर्धक दिसत नाही. शिवणीबांध येथील जलाशयावर आयोजित खासदार जलतरण स्पर्धेच्या माध्यमातून भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील जलतरणपटूंनी यशाचे शिखर गाठून जिल्ह्याचा नावलौकीक करावा, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले.
शिवनीबांध जलतरण संघटनेच्या वतीने रविवारी साकोली तालुक्यातील शिवनीबांध येथील जलाशयावर खासदार जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार बाळा काशीवार, अतिथी म्हणून राष्ट्रीय जलतरणपटू भोजराज मेश्राम, साहसी जलतरणपटू मनोहर मुळे, वैशाली चांदेवार, दिपक मेंढे, दिनेश गुप्ता, आयोजक अध्यक्ष राजेश बांते, सचिव मनिष कापगते, डॉ. चंद्रकांत निंबार्ते, डॉ. राजेश चंदवाणी, गिरिश रहांगडाले, जनार्धन दोनोडे आदी उपस्थित होते.
खासदार नाना पटोले म्हणाले साकोली तालुक्यात असलेला शिवनीबांध जलाशय निसर्गरम्य वातावरणात तयार आहे. स्पर्धेच्या माध्यमातून या जलाशयाची ओळख राज्यपातळीवर निर्माण झाली आहे. पर्यटनस्थळाच्या दृष्टीने हे स्थळ योग्य असून लवकरच ते घोषित करण्यात येईल. येत्या तीन वर्षात जलाशया संदर्भात असलेल्या समस्या दुर करण्यात येतील, असे आश्वासन दिले. स्पर्धेत २०० स्पर्धक सहभागी झाले होते. त्यांनी आपल्या कलाकौशल्य पणाला लावून पारितोषिक पटकाविले. अपंगांच्या २०० मीटर मुलींच्या स्पर्धेत प्रथम श्रुती नाकाडे, तर मुलांच्या स्पर्धेत प्रथम शुंभम मेश्राम, व्दितीय तुषार फुंडे, तर तृतीय नाशिक झंझाड यांनी प्राप्त केला. ५०० मीटर व १ किलोमिटरच्या खुल्या स्विमींग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात १० ते १६ वर्ष महिला गटात प्रथम क्रमांक सिध्दी मदनकर, द्वितीय क्रमांक चेतना बोरकर, तर तृतीय क्रमांक सरयू बिजवे यांनी पटकाविला. १० ते १४ वर्ष मुलांच्या वयोगटात प्रथम क्रमांक पियाशु पशिने, द्वितीय हर्षद सोनवाने, तृतीय उत्कर्ष हर्षे. १५ ते २५ वर्ष वयोगटात प्रथम कृणाल शक्तीकर, द्वितीय जय बावणकुळे, तृतीय राघवेंद्र कापगते. २६ ते ४० वयोगटात प्रथम प्रदीप वलधरे, व्दितीय मारोती भुरे, तृतीय सोनू गणविर, ४१ ते ५५ गटात प्रथम योगेश शक्तीकर, द्वितीय प्रशांत कारेमोरे , तृतीय शिवराज माळवी, तसेच ५५ ते अमर्याद वयोगटात प्रथम क्रमांक सुभाष पांडे तर द्वितीय क्रमांक परसराम फेंडरकर व तृतीय क्रमांक केशव भुरे यांनी पटकाविला.
स्पर्धेचे बक्षीस वितरण माजी आमदार सेवक वाघाये यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी राजेश बांते, मनिष कापगते, जनार्धन दोनोडे आदी उपस्थित होते. स्पर्धेसाठी मोरेश्वर डोये, राजेंद्र हर्षे, सुरेश लांजेवार, धनंजय हेडाऊ, रवि पंचबुध्दे, कैलाश लुटे, उमेश कठाणे, रामु कापगते, विजय साखरे, सचीन रंगारी, के.डी. टेंभरे, विनोद भेंडारकर, एकनाथ दोनोडे, विनोद हरणे यांच्यासह शिवनीबांध जलतरण संघटना साकोली, लाखनी, सानगडी, सासरा, साखरा, सावरबंध, येथील पदाधिकाऱ्यांनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Swimmers, make the district famous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.