स्वानंद महिला मंडळातर्फे भोंडला
By Admin | Updated: October 24, 2016 00:41 IST2016-10-24T00:40:13+5:302016-10-24T00:41:45+5:30
स्वानंद महिला मंडळातर्फे भोंडला

स्वानंद महिला मंडळातर्फे भोंडला
नाशिकरोड : जयभवानी रोड प्रधाननगर येथे स्वानंद महिला भजनी मंडळाच्या वतीने वयोवृद्ध महिलांनी भोंडला सण उत्साहात साजरा केला. स्वानंद महिला भजनी मंडळाच्या ५० ते ८० वयोगटांतील ज्येष्ठ महिलांनी भोंडला सण साजरा करताना टिपऱ्या, गाणी, नृत्य, फुगडी आदि खेळ सादर केले.
महिलांनी वेगवेगळ्या २५ पदार्थांचा अन्नकोट करून भोंडल्याची पूजा करत नैवेद्य दाखविला. सर्वांनी अंगत-पंगत करून भोंडला सणाची सांगता केली. यावेळी विमल एदलाबादकर, इंदू थोरात, उषा सोहनी, नीता गोरे, सविता नामजोशी, श्यामा ठोंबरे, सुधा जोशी, वैदेही कुलकर्णी, नीलिमा बाळापुरे, मेघा मदाने, अनघा जोशी, आरती साळवे, वंदना दीक्षित, कुंदा पंडित, मधुमती दीक्षित, शीला देशमुख, संगीता महालकर, कलावती अग्रवाल, अरुणा ठार्गे, शीला पाटील, साधना शिरसाट आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)