तिरूपती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:36 IST2021-08-15T04:36:32+5:302021-08-15T04:36:32+5:30

तालुका प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने इयत्ता बारावीच्या परीक्षेत मुंडीपार येथील तिरूपती विद्यालय तथा ...

Suyash of Tirupati Vidyalaya students | तिरूपती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश

तिरूपती विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे सुयश

तालुका प्रतिनिधी -

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्यावतीने इयत्ता बारावीच्या परीक्षेत मुंडीपार येथील तिरूपती विद्यालय तथा स्व. निर्धनराव पाटील वाघाये कनिष्ठ कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले. यात प्रथम खुशी सूर्यवंशी, तर द्वितीय वैष्णवी सेलोंकर, तृतीय क्रमांक आकांक्षा कुंभरे याने पटकाविला. त्यांच्या यशाबद्दल महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी प्राचार्य एच. ए. सिंगनजुडे, प्रमुख पाहुणे म्हणून पालक प्रमोद सूर्यवंशी, किरेट सेलोकर, अंबरदास कुंभरे, प्रा. एस. जे. धांडे, प्रा. आर. जे. आग्रे, प्रा. पी. टी. बहेकार, डी. बी. उईके, व्ही. जी. मानकर, ए. आर. तागडे, एन. एन. वाघाये, ए. व्ही. मेश्राम, जे. बी. चेटुले, एस. आर. चिमनकर, के. एस. कडव उपस्थित होते. प्रा. पी. टी. बहेकार यांनी सूत्रसंचालन केले, तर एस. जे. धांडे यांनी आभार मानले.

Web Title: Suyash of Tirupati Vidyalaya students