शास्त्री विद्यालयाच्या तन्मय नवलाखेचे सुयश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 04:22 IST2021-07-19T04:22:57+5:302021-07-19T04:22:57+5:30
भंडारा : स्थानिक लालबहादूर शास्त्री विद्यालयाचा विद्यार्थी तन्मय अनिल नवलाखे हा दहावीच्या माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत ४९४ गुण मिळवून (९८.८० ...

शास्त्री विद्यालयाच्या तन्मय नवलाखेचे सुयश
भंडारा : स्थानिक लालबहादूर शास्त्री विद्यालयाचा विद्यार्थी तन्मय अनिल नवलाखे हा दहावीच्या माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षेत ४९४ गुण मिळवून (९८.८० टक्के) प्राविण्यासह प्रथम आला. इतिहासप्रसिद्ध लालबहादूर शास्त्री शाळेच्या शीरपेचात त्यामुळे मानाचा तुरा खोवला गेला. शाळेतील दोनशे सहा विद्यार्थ्यांपैकी एकशे चौदा विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले, तर प्रथम श्रेणीत ८७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. द्वितीत श्रेणीत पाच विद्यार्थी असून, शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. तन्मय अनिल नवलाखे याचे अभिनंदन करण्यासाठी शाळेचा चमू तन्मयच्या घरी अभिनंदनास्तव दाखल झाला तेव्हा लालबहादूर शास्त्री विद्यालयाचा माजी मेरीटवीर चिन्मय अनिल नवलाखे याचीही भेट झाली. तन्मयने त्याचा मोठा भाऊ चिन्मयचा आदर्श जपला व दहावीत उज्ज्वल यश संपादन केले. या दोन्ही आजी व माजी मेरीटवीरांसह पिता अनिल नवलाखे व तन्मयची आई उज्ज्वला नवलाखे यांचाही शाळेकडून सन्मान करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामुजी शहारे, शाळेच्या प्राचार्या केशर बोकडे, वर्गशिक्षक शालिकराम ढवळे, शिक्षक अनिल करणकोटे, योगिता कापगते, विजयकुमार बागडकर, सुनील खिलोटे, स्मिता गालफाडे यांनी तन्मय नवलाखे व त्याच्या कुटुंबियांचा सत्कार केला.
आपल्या यशस्वी पाल्याचे कौतुक करण्यास शाळेतील मार्गदर्शक गुरुजनांच्या चमूने गृहभेट दिल्याबद्दल पालक प्रा. अनिल नवलाखे यांनी समाधान व्यक्त केले.